मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरिजा ओक आता हिंदी वेब सीरिजमध्येही आपला ठसा उमटवत आहे. मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले लवकरच ‘थेरपी शेरपी’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गिरिजा ओक मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण, मराठीसही तिने हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिने या सीरिजसाठी इंटिमेट सीन करतानाचा अनुभव सांगितला आहे…
इंटिमेट सीनबद्दल गिरीजा ओकची प्रतिक्रिया
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, “तुम्ही कितीही पूर्वतयारी केली तरी असे फार कमी लोक असतात, ज्यांच्यासोबत तुम्हाला थोडंही अस्वस्थ वाटत नाही. गुलशन अशाच लोकांपैकी एक आहे. त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन-चार उशा आणल्या. एक लहान, एक मोठी, एक मऊ आणि एक थोडी कडक. मला सर्वांत जास्त आरामदायक वाटणारी उशी निवडण्यास त्याने सांगितलं. शूटिंगदरम्यान त्याने मला किमान 16 ते 17 वेळा विचारलं असेल की, तू ठीक आहेस का? शूटिंगदरम्यान जेव्हा मला एका उशीचा त्रास होऊ लागला, तेव्हा ती अॅडजस्ट करण्यातही त्याने मदत केली.”
“तुला अधिक त्रास होत असेल तर आपण ही उशी काढून टाकुयात, मला काहीच समस्या नाही.. असं तो म्हणाला. त्याचं हे वागणं आणि त्याने दिलेला आदर पाहून मी खूप प्रभावित झाले. त्याच्या जागी जर दुसरा कोणता अभिनेता असता तर कदाचित कठीण वाटलं असतं. पण गुलशनने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली होती. आता मी त्याबद्दल मोकळेपणे बोलू शकते. कारण त्याच्यासोबत मला खूप सुरक्षित वाटत होतं”, असं गिरीजाने सांगितलं.
‘थेरपी शेरपी’ वेब सीरिज
‘थेरपी शेरपी’ या आगामी वेब सीरिजमध्ये गुलशन देवैया आणि गिरीजा ओक गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आली नाही.
View this post on Instagram
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





