MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निमिश कुलकर्णीचा साखरपुडा संपन्न, सोशल मीडियावर फोटो केले शेअर

Published:
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापनंतर आता निमिश कुलकर्णीही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने साखरपुड्याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोंमुळे निमिशची होणारी पत्नी कोण, यावर चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निमिश कुलकर्णीचा साखरपुडा संपन्न,  सोशल मीडियावर फोटो केले शेअर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. निमिषने थेट फोटो शेअर करत साखरपुडा केला असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली.

निमिष कुलकर्णी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. याशिवाय त्याने मालिकांमधूनही अभिनय करत प्रेक्षकांची मन जिंकली. अशातच आता निमिष व कोमल यांनी पारंपरिक अंदाजात साखरपुडा केला असून लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. निमिषने ही गुडन्यूज दिल्यानंतर अनेक चाहतेमंडळी त्याच्यावर कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

निमिश कुलकर्णीची होणारी पत्नी आहे तरी कोण?

निमिश कुलकर्णीची होणारी पत्नी सुद्धा मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून ती काम पाहते. तिचं नाव आहे कोमल भास्कर. साखरपुड्याचे फोटो शेअर करत कोमल लिहिते, “एक नवीन सुरुवात…आता आयुष्यभर आम्ही एकत्र असू..” याशिवाय कॅप्शनमध्ये तिने साखरपुड्याची तारीख देखील नमूद केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांच्या गमतीदार कमेंट्स

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनी निमिशने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर “खूप खूप अभिनंदन जावईबापू” अशी कमेंट केली आहे.  तर शिवाली परबने या पोस्टवर ‘माझी शोनी’ असं म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी शिवालीची खिल्ली उडवत “शिवु तुझ्या निषिम गेला गं बाईं! आता काय?”, “शेवटी कंटाळून निमिषने लग्न केलं”, असं म्हटलं आहे. तर शिवालीने खास स्टोरीही पोस्ट करत, “खूप खूप अभिनंदन माय बेबीज. खूप प्रेम. कायम एकमेकांबरोबर राहा. तुम्हाला कोणाची नजर ना लागो”, असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Komal Bhaskar (@komal_bhaskar25)

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)