बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगने नुकतेचं नवीन 3 टॅटू काढले आहे. हनी सिंगने त्याच्या शरीरावर पहिल्यांदाच टॅटू काढले आहेत. विशेष म्हणजे, त्याने त्याच्या आईसोबतच आणखी एका व्यक्तीसाठी हे टॅटू काढले आहेत. त्याने हे तीन टॅटू त्याचा सगळ्यात जवळच्या लोकांसाठी काढले आहे. पाहूयात नेमकं काय आहे या टॅटूमध्ये….
आईसाठी काढला खास टॅटू
हनी सिंगने इंस्टाग्रामवर त्याचा पहिला टॅटू दाखवला. हनी सिंगने त्याच्या पहिल्या टॅटूच्या कॅप्शनमध्ये “माझा पहिला टॅटू झाला!! माझ्या आईची सही” असे लिहिले आहे. त्याने त्याच्या आईची सही आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे चित्र असलेला टॅटू काढला आहे. त्याने हा टॅटू सोशल मीडियावर शेअर केला आणि “पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत महिला” म्हणून आपल्या आईचा उल्लेख केला. सोनू सूद, शहनाज गिल यांनी त्याच्या टॅटूचे कौतुक केले.

View this post on Instagram
“माझ्या लेजेंडसाठी तिसरा टॅटू!”
View this post on Instagram
दुसरा टॅटू
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











