झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘चला हवा येऊ द्या’ हा शो जवळपास दीड वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. आता या पाठोपाठ वाहिनीवर आणखी एक जुना रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘आम्ही सारे खवय्ये’.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे शो होस्ट करणार
लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा शो होस्ट करणार आहे. तर, यंदाची थीम असेल जोडीचा मामला. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. “आता जोडीने वाढणार खमंग जेवणाची गोडी, सोबतीला असेल धमाल आणि कमाल लव्हस्टोरी!” असं कॅप्शन देत वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आम्ही सारे खवय्ये’ या शोच्या नव्या प्रोमोमध्ये संकर्षण कऱ्हाडेसह प्रेक्षकांना मृण्मयी देशपांडे-स्वप्नील राव, अभिजीत खांडकेकर- सुखदा खांडकेकर, हेमंत ढोमे – क्षिती जोग या जोडप्यांची झलक पाहायला मिळत आहे.

आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्ये! ‘झी मराठी’वर गाजलेला रिअॅलिटी शो पुन्हा सुरू होणार आहे. आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर दुपारच्या सत्रात प्रसारित केला जायचा. घराघरांतील गृहिणी मोठ्या आवडीने हा कार्यक्रम पाहायच्या. प्रशांत दामले, राणी गुणाजी, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांनी हा कार्यक्रम होस्ट केला होता. २००७ पासून वाहिनीवर या कार्यक्रमाची सुरूवात झाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सेलिब्रिटी जोड्यांच्या खास रेसिपीज, मजेशीर किस्से आणि मराठी संस्कृतीच्या चविष्ट वाटा असलेला ‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’ हा कार्यक्रम येत्या 9 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुपारी 1 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











