२००९ मध्ये रितेश देशमुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण; आज आहे १०० कोटींची मालकीण

अवघ्या काही निवडक चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने काम केलं आहे. तिचे चित्रपट फारसे गाजलेही नाहीत. मात्र या अभिनेत्रीकडे प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला आणि खासगी आयलँड आहे.

बॉलीवूडमध्ये आज अनेक अभिनेत्री कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. पण हे मानधन अभिनेत्यांच्या तुलनेत कित्येक पटीने कमी असते. अशा स्थितीतही फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आज कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. फिल्म इंडस्ट्रीत यश मिळवलेल्या कलाकारांच्या यादीत अनेक विदेशी अभिनेत्रींचाही समावेश आहे. यात नोरा फतेही, जॅकलीन फर्नांडिस आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. या सर्वांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावले आणि प्रचंड स्टारडम मिळवले.

दरम्यान, आज येथे आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्याकडे तिचे प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, लक्झरी कार आणि स्वतःचं एक खासगी बेट (प्रायव्हेट आयलंड) देखील आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिस आहे. जॅकलिन गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून बॉलीवूड सृष्टीत सक्रिय आहे.

२००९ मध्ये रितेश देशमुखसोबत पदार्पण

जॅकलीन हिने २००९ मध्ये अलादीन या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात रितेश देशमुख तिचा हिरो होता.

बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये केवळ जॅकलीनकडे प्रायव्हेड आयलंड

विशेष म्हणजे, जॅकलीन फर्नांडिस ही बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे, जिच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट आयलंड आहे. जॅकलीनने २०१२ मध्ये श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेले हे ४ एकरांचे खासगी बेट विकत घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलीनने हे आयलंड खरेदी करताना ६,००,००० डॉलर (त्यावेळेस सुमारे ३ कोटी रुपये) खर्च केले होते. एका जुन्या मुलाखतीत तिने या जागेवर एक आलिशान बंगला बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, हा बंगला तिच्या वैयक्तिक वापरासाठी असेल, की व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने देण्यात येईल, याबाबत तिने कधीही स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. सोबतच या बाबतीतही कोणतीही पारदर्शक माहिती उपलब्ध नाही, की जॅकलीनने बेट खरेदी केल्यानंतर त्याचे पुढे नेमके काय केले. पण एवढे मात्र स्पष्ट आहे, ती आजही त्या खासगी बेटाच्या मालकीण आहे.

मर्डर २ मधून खरी ओळख मिळाली

जॅकलीन फर्नांडिस यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ चित्रपटातून केली होती, परंतु तिला खरी ओळख आणि यश २०११ मध्ये आलेल्या मर्डर २ या चित्रपटातून मिळाले. गेल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये जॅकलीनने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. यात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

जॅकलीन फर्नांडिसची एकूण संपत्ती

ताज्या माहितीनुसार जॅकलीन फर्नांडिस हिची एकूण संपत्ती सुमारे ११५ कोटी रुपये आहे. तिने ही संपत्ती केवळ चित्रपटांमधून कमावली नाही. तर ब्रँड एंडोर्समेंट, इव्हेंट्स आणि रिअल इस्टेट गुंतवणूक यातूनही भरपूर कमाई केली आहे. तिच्याकडे प्रायव्हेट आयलंडसह, लक्झरी कार्स आणि मुंबईत एक आलिशान घरसुद्धा आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News