Marathi News

Jitendra Fall Down : 83 वर्षीय जंपिंग जॅक जितेंद्र तोल जाऊन पडले; फॅन्सला चिंता, मुलगा तुषारने दिली अपडेट

Published:
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. अनेकांनी “जितू जी ठिक आहेत ना?” असे कमेंट्स केले
Jitendra Fall Down : 83 वर्षीय जंपिंग जॅक जितेंद्र तोल जाऊन पडले; फॅन्सला चिंता, मुलगा तुषारने दिली अपडेट

बॉलिवूडचे सदाबहार अभिनेता आणि “जंपिंग जॅक” म्हणून प्रसिद्ध जितेंद्र अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. मंचाकडे जात असताना छायाचित्रकारांनी त्यांना वेढले आणि कॅमेऱ्यांच्या फ्लॅश लाइट्स चमकू लागल्या. हसतमुखाने चाहत्यांना हात दाखवत पुढे जात असताना, फर्शावरच्या थोड्या उंचवट्यावर त्यांचा पाय अडखळला आणि ते अचानक तोल जाऊन खाली पडले. (Jitendra Fall Down)

क्षणभरासाठी उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळ माजला. सर्वजण त्यांच्या मदतीसाठी धावले, पण काही सेकंदातच जितेंद्र स्वतः उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांनी इशाऱ्याने सांगितलं की ते पूर्णपणे ठिक आहेत आणि त्यांना काही इजा झालेली नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Jitendra Fall Down)

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. अनेकांनी “जितू जी ठिक आहेत ना?” असे कमेंट्स केले. यावर त्यांच्या मुलगा तुषार कपूरने ‘बॉम्बे टाईम्स’शी बोलताना सांगितले, “बाबा अगदी ठिक आहेत. फक्त पाय घसरून पडले, पण काहीही दुखापत झालेली नाही. तुषारच्या या अपडेटनंतर चाहत्यांनाही दिलासा मिळाला. कारण ८३ वर्षांच्या वयात छोट्या अपघातालाही (Jitendra Fall Down) मोठं रूप घेण्याची शक्यता असते.

जितेंद्र यांचे चित्रपट

जितेंद्र यांनी ७० आणि ८० च्या दशकात ‘परिचय’, ‘हमजोली’, ‘फर्ज’, ‘धरमवीर’, ‘एक ही भूल’, ‘जुड़वा’ अशा सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांच्या पांढऱ्या कपड्यांच्या स्टाइलपासून ते उत्साही अभिनयापर्यंत सगळं काही आजही चाहत्यांना आठवतं. सध्या दिलासादायक बाब म्हणजे जितेंद्र पूर्णपणे ठणठणीत आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews