Jolly LLB 3 Trailer : आता 1 नाही 2 जॉलींचा ‘कलेश’ कोर्टात! ‘जॉली एलएलबी 3’ चा धमाकेदार ट्रेलर OUT

हा चित्रपट शेतकऱ्यांच्या सत्यघटनांवर आधारित असून त्यात हास्य, संघर्ष आणि सत्याचा शोध एकत्र गुंफलेला आहे.

या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ‘जॉली एलएलबी 3’ अखेर आपल्या चाहत्यांसमोर येण्यासाठी सज्ज झाला (Jolly LLB 3 Trailer) आहे. अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या कॉमिक टाइमिंगसह कोर्टरूम ड्रामाला एका नव्या उंचीवर नेणारा हा चित्रपट, यंदा केवळ हास्याची डोस नाही, तर एक गंभीर सामाजिक मुद्दाही उचलतोय शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचं सत्य.

दोन जॉली, एक कोर्ट, आणि जज त्रिपाठीची कसोटी!

या भागात खास बाब म्हणजे एक नाही तर दोन ‘जॉली’ कोर्टात आमने-सामने येणार आहेत. एकीकडे अक्षय कुमार म्हणजेच कानपूरचा जॉली, तर दुसरीकडे अरशद वारसी, मूळचा ‘जॉली एलएलबी’चा नायक. जज सुंदरलाल त्रिपाठी (सौरभ शुक्ला) यांच्यासाठी ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची ठरणार आहे.

ट्रेलरमध्ये दाखवले आहे की (Jolly LLB 3 Trailer) एक जॉली बिझनेसमनकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांची जमीन बळकावणाऱ्या  प्रकरणात वकिली करतो, तर दुसरा जॉली त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभा असतो. कोर्टात सुरु होतो दोघांमधील खरा ‘कलेश’  क्लायंट चोरायचे, मुद्दे पळवायचे आणि जजसमोर उडणारे फटाके!

अमृता सिंगचे दमदार पुनरागमन

ट्रेलरमध्ये सर्वात मोठा सरप्राईज ठरली ती अमृता सिंग– या चित्रपटातून त्या मोठ्या कालावधीनंतर परतत आहेत. चाहत्यांना त्यांचं नव्या अंदाजातलं दर्शन घडतंय. त्याचबरोबर, हुमा कुरेशी पुन्हा एकदा पुष्पा पांडे मिश्रा या भूमिकेत झळकणार आहे – अक्षय कुमारच्या पत्नीच्या रूपात.

समाजिक भान आणि कॉमेडीचा परफेक्ट मिक्स

चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवलेली शेतकरी आणि पोलिसांमधील संघर्ष ही दृश्यं, प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवतात. शेतकऱ्यांची जमीन कशी बळकावली जाते आणि त्यामागची सिस्टीम कशी काम करते – हे सत्य विनोदी ढंगात मांडण्याचा प्रयत्न केलाय.

कधी होणार प्रदर्शीत? Jolly LLB 3 Trailer 

‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट शेतकऱ्यांच्या सत्यघटनांवर आधारित असून त्यात हास्य, संघर्ष आणि सत्याचा शोध एकत्र गुंफलेला आहे.

जॉली LLB-3 मध्ये तुमचं स्वागत आहे एका कोर्टरूम ‘कलेश’मध्ये, जिथे दोन जॉली एकमेकांवर कुरघोडी करतायत आणि न्यायासाठीचा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अमृता सिंगचं कमबॅक आणि गंभीर सामाजिक प्रश्नांची मांडणी यामुळे चित्रपट पाहणं म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार यात शंका नाही


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News