Jui Gadkari: ताई तुझं लग्न ठरलं का?? जुईच्या उत्तराची जोरदार चर्चा

Asavari Khedekar Burumbadkar

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (Jui Gadkari) …. पुढचं पाऊल, माझ्या प्रियाला प्रित कळेना, वर्तुळ, अशा अनेक सुपरहिट मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेल्या जुई गडकरीचा फॅन फॉलोवर्स बेसही प्रचंड आहे. जुई सोशल मीडियावरही सतत ऍक्टिव्ह असते, वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते आणि आपल्या चाहतांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या मराठी मालिकेत काम करत आहे… मालिकेतील प्रमुख पात्र असलेल्या सायलीची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावत जुईने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

जुई ने घेतलं आस्क मी सेशन- Jui Gadkari 

जस आम्ही सांगितलं की, जुई गडकरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला… यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडलं… परंतु जुई ने सुद्धा चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाला बिनधास्तपणे उत्तरे दिली… एक जण म्हणाला तू मालिकेत ज्या प्रकारे सायलीचे पात्र निभावत आहेस त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात सुद्धा तू अशीच शांत आहेस का ?? यावर उत्तर देताना जुई म्हणाली नाही, खऱ्या आयुष्यात मी खूप मस्तीखोर आहे.

दुसरा एक यूजर म्हणाला, जर तुझ्या फॅन्स चे वर्णन एका शब्दात करायचं असेल तर तू कसं करशील यावर उत्तर देताना जुई म्हणाली माझे चाहते अगदी मोदकासारखे आहेत…. हे सांगत असताना तिने मोदकाचा फोटोही च्या त्यांना दाखवला…

ताई तुझं लग्न ठरलं का?

तिसऱ्या एका युजरने तर हद्दच केली…  त्याने थेट जुईला तिच्या लग्नाबद्दल विचारलं. ताई तुझं लग्न ठरलं आहे का असा सवाल चाहत्याने केला. यावर जुई ने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे…. ठरलं तर मग असं उत्तर देत जुईने हसण्याची ईमोजी शेअर केली…..

ताज्या बातम्या