सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्याबाबत सध्या वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. काजल अग्रवाल चा अपघातात मृत्यू झाला आहे अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत (Kajal Agarwal Accident Rumours). तर काही ठिकाणी काजल अग्रवाल या अपघातात गंभीररित्या जखमी झाली अशा चर्चा सुरू आहेत. आता या सर्व चर्चांवर आणि अफवांवर खुद्द काजलनेच उत्तर दिले आहे. माझा अपघात झालाय या बातमीत काही तथ्य नाही… तसेच मी पूर्णपणे सुरक्षित आणि ठीक आहे असे स्पष्टीकरण काजल अग्रवाल ने दिले आहे. स्वतः काजलनेच अपघाताच्या चर्चा फेटाळून लावल्याने तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय म्हणाली काजल अग्रवाल? Kajal Agarwal Accident Rumours
आपल्या अपघाताची आणि मृत्यूची अफवा वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काजलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात तिने म्हटलं, मला काही निराधार बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत, ज्यात दावा केला आहे की माझा अपघात झाला (आणि मी आता या जगात नाही) आणि खरे सांगायचे तर ते खूप मजेदार आहे कारण ते पूर्णपणे खोटे आहे. देवाच्या कृपेने, मी तुम्हाला सर्वांना खात्री देऊ इच्छितो की मी पूर्णपणे ठीक आहे, सुरक्षित आहे आणि उत्तम कामगिरी करत आहे. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका. चला आपली ऊर्जा सकारात्मकता आणि सत्यता दाखवण्यावर दाखवा…. तुमच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. (Kajal Agarwal Accident Rumours)

काजल दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री –
दरम्यान, काजल अग्रवाल ही दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे, काजल अग्रवालच्या चहा त्याची संख्याही मोठी आहे. सोशल मीडियावर सुद्धा तिचे करोडो फॉलोवर्स आहेत. सध्या काजल तिचा पती गौतम किचलूसोबत मालदीवला गेलीनाही. तिने इंस्टाग्रामवर फोटोही शेअर केलेत. तिने सांगितले की मालदीव हे तिच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे आणि तिला येथे पुन्हा पुन्हा यायला आवडेल.
काजलचा कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती आगामी चित्रपट ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ मध्ये दिसणार आहे. वृत्तानुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात काजल यशच्या रावणासोबत मंदोदरीची भूमिका साकारत आहे. याशिवाय, ती ‘द इंडिया स्टोरी’, ‘इंडियन ३’ आणि ‘रामायण: पार्ट २’ सारख्या चित्रपटांमध्येही ती झळकेल .











