Kantara Chapter 1 Box Office Collection : कांतारा चॅप्टर 1 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; किती कोटींची कमाई?

Asavari Khedekar Burumbadkar

दक्षिणेतील प्रतिभावान अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याची नवी फिल्म ‘Kantara Chapter 1 Box Office Collection प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षांवर खरा उतरला असून, बॉक्स ऑफिसवर तिने जोरदार कमाई करत वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरण्याची वाट धरली आहे. २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात जी खास जागा निर्माण केली होती, त्यानंतर या कथानकाच्या पुढच्या भागाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, ‘कांतारा: चैप्टर 1’ ने प्रदर्शित होताच सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी उसळली आहे.

किती कोटींची कमाई? Kantara Chapter 1 Box Office Collection

चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी Kantara Chapter 1 ने Sacnilk.com च्या  आकडेवारीनुसार केवळ मॉर्निंग शोमध्ये २९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  विश्लेषकांच्या मते, एकूण दिवसभरात हा आकडा ७० ते ७५ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अशा प्रकारची सुरुवात क्वचितच एखाद्या चित्रपटाला मिळतो. या कमाईच्या जोरावर ‘कांतारा: चैप्टर 1’ ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे आणि यामुळेच प्रेक्षकांमध्ये यापुढील कथानकाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचे केवळ प्रेक्षक नव्हे तर चित्रपटसृष्टीतील कलाकारही कौतुक करत आहेत. विशेषतः प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता जूनियर NTR यांनी ऋषभ शेट्टीच्या कार्याची स्तुती करताना म्हटले की, “अशा प्रकारचा अद्भुत आणि सशक्त सिनेमा तयार करणे हे प्रत्येकाच्या आवाक्याचे काम नाही. ऋषभ शेट्टी आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मेहनत या चित्रपटामध्ये स्पष्टपणे दिसून येते.”

सनी संस्कारी की तुलसी कुमारीला कमी प्रतिसाद –

दुसऱ्या बाजूला, अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री जान्हवी कपूर, सानिया मल्होत्रा आणि रोहित सुरेश सराफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटालाही त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आले. तथापि, या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून, पहिल्या दिवशी केवळ ३.३८ कोटी रुपयांचीच कमाई करण्यात त्याला यश आले आहे. ‘कांतारा’च्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी असून, प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चित्रपट समीक्षकांच्या मते, तुलसी कुमारीचे कथानक आणि सादरीकरण फारसे प्रभावी ठरले नसल्याने प्रेक्षकांचा ओढा ‘कांतारा’कडे अधिक आहे.

‘कांतारा: चैप्टर 1’ चे बजेट जवळपास १२५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता, या चित्रपटाने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे. जर पुढील आठवड्यांमध्येही ही गती कायम राहिली, तर ‘कांतारा’ वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील होण्याची पूर्ण शक्यता आहे.

एकंदरीत, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि रहस्यमय गोष्टींचे मिश्रण असलेला ‘कांतारा: चैप्टर 1’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, तर दुसरीकडे ‘तुलसी कुमारी’ला त्याच तुलनेत फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. आता प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिस यांच्याकडून मिळणारा पुढील आठवड्यांचा प्रतिसाद या दोन्ही चित्रपटांचे भवितव्य ठरवणार आहे.

ताज्या बातम्या