Katrina Kaif Vicky Kaushal’s Baby: बॉलिवूड इंडस्ट्रीतील आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघेही आईबाबा बनले आहेत. ज्या क्षणाची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहावी लागली तो क्षण आता आला आहे.

कतरिनाने दिला मुलाला जन्म-
आज, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी, कतरिनाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. या स्टार जोडप्याला पुत्रप्राप्तीचा आनंद मिळाला आहे. ही बातमी समोर येताच, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन आणि आशीर्वाद देत आहेत. विकी आणि कतरिनाने ही आनंदाची बातमी एका अतिशय सुंदर पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने आज, ७ नोव्हेंबर रोजी एका मुलाला जन्म दिला. विकी कौशल आणि कतरिना एका बाळाचे पालक झाले आहेत. विकी आणि कतरिना यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही बातमी शेअर केली. कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आमच्या आनंदाचे क्षण आले आहेत. अपार प्रेम आणि कृतज्ञतेने, आम्ही आमच्या बाळाचे स्वागत करतो”.
२०२१ मध्ये लग्नबंधनात अडकलेलं जोडपं-
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा भाऊ, सनी कौशल, “मी काका आहे” असे लिहून आनंद व्यक्त केला. कतरिनाबद्दल सांगायचे तर, तिने तिच्या गरोदरपणाबद्दल बराच वेळ खाजगी ठेवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये, कतरिनाने पती विकीसोबत तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली होती. तिचा बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. कतरिना आणि विकी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. आणि दोघेही आता पालकत्वाचा आनंद घेत आहेत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)