नव्वदच्या दशकात आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण आहे तिचं वादग्रस्त वक्तव्य.दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही (Mamta Kulkarni On Dawood Ibrahim) असे ममता कुलकर्णी हिने म्हटल आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविषयी तिनं केलेल्या या विधानामुळे चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
काय म्हणाली ममता कुलकर्णी – Mamta Kulkarni On Dawood Ibrahim
ममता कुलकर्णीनं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दाऊद इब्राहिमचा बचाव करताना म्हटलं की, “दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही. त्यानं देशविघातक कृत्य केलेली नाहीत आणि बॉम्बस्फोटासारख्या घटनांमध्ये त्याचं नाव चुकीने जोडण्यात आलं. माध्यमं आणि काही राजकीय शक्तींनी त्याच्याविरुद्ध कट रचून त्याला बदनाम केलं आहे. एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यासाठी आरोप सिद्ध होणं गरजेचं असतं, केवळ प्रचारावरून कुणालाही दोषी ठरवता येत नाही.”

मी त्याला कधीच भेटली नाही
त्यानंतर ममता पुढे म्हणाली, “दाऊदशी माझं काहीच देणंघेणं नाही. ज्याचं नाव माझ्यासोबत जोडण्यात आलं, त्यानं कधीही देशविघातक काम केलेलं नाही. मी त्याला कधीच भेटले नाही. लोकांनी ऐकीव गोष्टींवरून निष्कर्ष काढू नयेत. या वक्तव्यामुळे ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni On Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अनेकजण तिच्या या विधानावर टीका करत आहेत, तर काहीजण तिला स्पष्टवक्ती आणि धैर्यशील म्हणत तिच्या बाजूने बोलत आहेत.
दरम्यान, ममताचं नाव पूर्वीही अंडरवर्ल्डशी जोडण्यात आलं होतं. 1998 मध्ये छोटा राजनसोबत तिचे संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या काळात ‘चायना गेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजकुमार संतोषी यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे तिचं करिअर अचानक थांबलं. या घटनेनंतर ती बॉलिवूडमधून जवळपास गायब झाली.
यानंतर 2016 मध्ये केनियामध्ये तिचा कथित पती विक्रम गोस्वामी उर्फ विक्की ड्रग तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतर पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेत आलं. विक्कीवर छोटा राजन आणि दाऊद गँगमधील शत्रुत्वात सहभागी असल्याचा आरोप होता. त्यामुळे ममताचं नावही या प्रकरणात ओढलं गेलं. मात्र, तिनं हे सर्व आरोप ठामपणे नाकारले.
खूप वर्षांनंतर ममता भारतात परतली आणि 2025 च्या कुंभमेळ्यात तिनं संन्यास स्वीकारला. तिनं ‘माई ममता नंद गिरी’ या नावाने आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार केला असून सध्या ती धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सक्रिय आहे. एकेकाळी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ममता कुलकर्णी आता पूर्णपणे वेगळ्या जीवनप्रवाहात वावरत असली तरी, तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अजूनही चर्चेच्या झोतात असते. तिच्या या नव्या विधानाने पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर चर्चा पेटली आहे आणि अनेकांनी तिच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.











