MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Priya Marathe News : तब्येतीच्या अडचणीबाबत प्रिया मराठेने आधीच दिली होती माहिती, Video सोशल मीडियावर व्हायरल

Written by:Smita Gangurde
Published:
मालिकेतून बाहेर पडण्यापूर्वी प्रियाने एक व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला होता. यावेळी तिने आपल्या आरोग्याची माहिती दिली होती.
Priya Marathe News : तब्येतीच्या अडचणीबाबत प्रिया मराठेने आधीच दिली होती माहिती, Video सोशल मीडियावर व्हायरल

Priya Marathe dies due to cancer : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी अक्षरश: हादरली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कॅन्सरच्या उपचारादरम्यान प्रियाचं निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून ती कॅन्सरवर उपचार घेत होती. तिच्या या आजाराबाबत काही जवळची माणसं वगळता कुणाला काहीच माहिती नव्हतं. दोन वर्षांपासून ती टीव्ही मालिकेपासून दूर होती. मालिकेतून बाहेर पडण्यापूर्वी प्रियाने एक व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला होता. यावेळी तिने आपल्या आरोग्याची माहिती दिली होती.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेतून बाहेर जाण्यापूर्वी प्रियाचा व्हिडिओ

तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहवरील मालिकेत प्रिया मराठे महत्त्वाची भूमिका साकारल होती. या मालिकेत ती मोनिका कामत ही निगेटिव्ह भूमिका साकारत होती. ३ जुलै २०२३ मध्ये तिने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने तुझेच मी गीत आहे, या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. तब्येतीच्या अडचणीमुळे ही मालिका सोडत असल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र यावेळी तिला कॅन्सरच निदान झालं होतं, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)


ती या व्हिडिओमध्ये म्हणते, अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला मोनिका कामत ही भूमिका सोडावी लागत आहे. मला ही भूमिका साकारायला खूप आवडत होतं. तुम्ही माझ्यावर खूप प्रेमही केलं. मात्र मी जो वेळ यांना देऊ शकत होते, तो वेळ अपुरा पडत होता. यामुळे मला मालिकेतून निरोप घ्यावा लागत आहे. पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका असंही तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

लवकरच परत येणार आहे…

या व्हिडिओमध्ये प्रियाने प्रेक्षकांना लवकरच परत येणार असल्याचं वचन दिलं होतं. तब्येतीच्या अडचणीमुळे थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते. मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद, असंही तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं.