अस्सल मराठमोळा ‘गोंधळ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

Rohit Shinde

एक जबरदस्त असा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टिझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘गोंधळ’ला चांगले यश मिळण्याचा अंदाज

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘गोंधळ’ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या 20 टक्के प्रदेशात ‘कांतारा’मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठे स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल 80 टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘कांतारा’ चित्रपटासोबतच एका मराठमोळ्या चित्रपटाचा टिझर तुफान चर्चेत आहे. हा टिझर आहे ‘गोंधळ’ या आगामी मराठी चित्रपटाचा. केवळ काही सेकंदांच्या या टिझरने प्रेक्षकांना भुरळ पाडली असून, या चित्रपटाची भव्यता, तांत्रिक उत्कृष्टता आणि दमदार सिनेमॅटोग्राफी पाहून प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’च्या अभूतपूर्व यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या मूळ संस्कृतीशी जोडलेली आणि मातीचा स्पर्श असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच आवडते. ‘गोंधळ’ हाच वारसा पुढे नेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम पडद्यावर सादर करणार आहे.

14 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार!

हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गोंधळ’चा टिझर आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा आणि लोककला यांना आधुनिक सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे. टिझरमधून असे दिसते की, नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून ही कथा काहीतरी वेगळेच रहस्य उलगडणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी विशेष म्हणजे ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी हा सिनेमा मोठी पर्वणी ठरण्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या