Mrs Deshpande Trailer : बॉलिवूडची धडकन म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा OTT प्लॅटफॉर्मवर एका हटके भूमिकेसह परतली आहे. जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या तिच्या ‘मिसेस देशपांडे’ या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. माधुरीचा हा अवतार इतका वेगळा आहे की, प्रेक्षकांना एका क्षणासाठीही नजरा हटवणे कठीण झाले आहे.
काय आहे ट्रेलर मध्ये? Mrs Deshpande Trailer
या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित एका कॉन्विक्टेड सीरियल किलरच्या भूमिकेत दिसते. तिच्या कारकिर्दीतील हा सर्वात डार्क, धडकी भरवणारा आणि मानसशास्त्रीय ट्विस्टने भरलेला रोल मानला जात आहे. ट्रेलरची सुरुवातच एका थरारक फ्लॅशबॅकने होते जिथे मिसेस देशपांडेच्या भयानक किलिंग पॅटर्नची झलक मिळते. गळा दाबणे, शिकाराला खोलीत खेचून नेणे आणि उघड्या डोळ्यांनी आरशासमोर सोडून देणे. हे तिचे सिग्नेचर मर्डर स्टाईल दाखवले जाते.Mrs Deshpande Trailer

पण खरा ट्विस्ट तेव्हा उलगडतो जेव्हा पोलिसांना कळते की जेलमध्ये बंद असलेल्या मिसेस देशपांड्यांसारख्याच पद्धतीने आता कोणीतरी बाहेर खून करत आहे. याच धाग्याला पकडत पोलिस अधिकारी, ज्याची भूमिका प्रियांशु शर्मा साकारत आहे, मिसेस देशपांड्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतो. मग पुढचा प्रश्न असा उभा राहतो की ती खरोखर पोलिसांना मदत करते आहे का, की तुरुंगातूनच त्या नव्या किलरला मार्गदर्शन करत आहे? ट्रेलरमधील “कधी कधी किलरला पकडण्यासाठी, किलरचीच मदत घ्यावी लागते” हा संवाद सध्या चाहत्यांमध्ये हटके व्हायरल झाला आहे.
या सीरिजचे दिग्दर्शन प्रसिद्ध फिल्ममेकर नागेश कुकुनूर यांनी केले आहे. ‘इकबाल’, ‘डोर’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ यांसारख्या वास्तववादी कथा सांगणाऱ्या प्रकल्पांनंतर ते या वेब सिरीजमधून एक अत्यंत डार्क मानसशास्त्रीय थ्रिलर घेऊन आले आहेत. इंडस्ट्रीत या शोला नागेश कुकुनूर यांचा आतापर्यंतचा सर्वात प्रयोगशील आणि रोमहर्षक प्रकल्प मानले जात आहे.
मिसेस देशपांडे ही फ्रान्सच्या लोकप्रिय ‘ला मांत’ (The Mantis) या सिरीजवरून सैल प्रेरित आहे. फ्रेंच सिरीजमध्येही कथा एका महिला सीरियल किलरभोवती फिरते जी तिच्याच कॉपीकॅट किलरला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करते. मात्र भारतीय आवृत्तीत कथेला अधिक मानसिक गुंतागुंतीची आणि भावनिक अंगांची जोड देण्यात आली आहे.
कधी रिलीज होणार
ही थरारक वेब सिरीज 19 डिसेंबरला जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांसमोर येणार आहे. माधुरी दीक्षितच्या चाहत्यांना तिच्या वेगळ्या भूमिकेची मागणी बऱ्याच काळापासून होती आणि ‘मिसेस देशपांडे’ ही सिरीज त्या उत्सुकतेला योग्य न्याय देणारी ठरत आहे. 2024 मध्ये ‘भूल भुलैया 3’मध्ये दिसल्यानंतर माधुरीचा हा नवा, धाडसी आणि अंधाराने भरलेला अवतार प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे. ट्रेलरवरूनच स्पष्ट होते की ही सिरीज फक्त थरारक कथेपुरती मर्यादित नसून मानवी मनाच्या गुंतागुंतींचाही सखोल शोध घेते. प्रेक्षकांना एका चित्तथरारक खेळात ओढून नेणारी ही कथा OTT विश्वात मोठा प्रभाव टाकणार असल्याची चर्चा आधीच सुरू झाली आहे.