Nandish Singh Sandhu Engagement : रश्मी देसाईचा एक्स-पती नंदीश संधू पुन्हा विवाहबंधनात शेअर केली खास पोस्ट

Asavari Khedekar Burumbadkar

रश्मी देसाईचा माजी पती आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नंदीश संधू (Nandish Singh Sandhu Engagement) पुन्हा एकदा आयुष्यात पुढे जात आहे. त्याने अलीकडेच आपली मंगेतर कविता बनर्जी हिच्यासोबत साखरपुडा केल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टनंतर दोघांना चाहत्यांकडून आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रश्मी आणि नंदीशची प्रेमकहाणी ‘उतरन’ या मालिकेपासून सुरू झाली होती. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या मतभेदांमुळे २०१५ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो (Nandish Singh Sandhu Engagement)

रश्मीने आपल्या आयुष्यातील चढ-उतारांवर अनेक वेळा मोकळेपणाने बोलले आहे आणि विभक्तीनंतरही ती करिअरमध्ये सातत्याने प्रगती करत राहिली. आता तिचा पूर्वीचा पती नंदीश नवे आयुष्य सुरू करत आहे.नंदीशने इन्स्टाग्रामवर कविता बनर्जीसोबतचे काही फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. या फोटोंमध्ये कविता पारंपरिक लूकमध्ये दिसते आहे, तर नंदीशने ब्लेझर लूकमध्ये आकर्षक पोझ दिला आहे. एका फोटोमध्ये दोघं समुद्रकिनारी बिअरच्या बाटल्या घेऊन आनंद साजरा करत आहेत आणि एका इमेजमध्ये त्यांनी एकमेकांना घातलेल्या अंगठ्या दाखवल्या आहेत.

कोण आहे कविता बॅनर्जी

कविता बनर्जी ही मूळची कोलकात्याची असून ती ‘रिश्तों का मांझा’, ‘भाग्यलक्ष्मी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. काही वेब सिरीज आणि चित्रपटांतूनही ती प्रेक्षकांसमोर आली आहे. रश्मी देसाईकडून या साखरपुड्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र चाहते मात्र तिच्या आणि नंदीशच्या भूतकाळाच्या आठवणी जागवत सध्याच्या घडामोडींकडे पाहत आहेत.

ताज्या बातम्या