बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला ‘जवान’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटासाठी त्याच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (National Film Awards 2025) शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याच पुरस्कारासाठी अभिनेता विक्रांत मॅसीलाही ‘१२वी फेल’ चित्रपटासाठी गौरवण्यात आले आहे.
राणी मुखर्जीच्या शेजारी बसलेला शाहरुख National Film Awards 2025
दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या या पुरस्कार समारंभात (National Film Awards 2025) बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात शाहरुख खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये उपस्थित होता. त्याची जागा अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शेजारी होती. या दोघांच्या चेहऱ्यावर पुरस्कार मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

अभिनय ही जबाबदारी आहे: शाहरुख खान
१ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कारांची घोषणा झाली होती. त्यानंतर शाहरुख खानने एक व्हिडिओ जाहीर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “या सन्मानासाठी भारत सरकारचे मनापासून आभार. माझ्यावर मिळत असलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ गौरव नाही, तर एक आठवण आहे – की अभिनय ही केवळ नोकरी नाही, तर जबाबदारी आहे. पडद्यावर सत्य दाखवण्याची जबाबदारी.” National Film Awards 2025
शाहरुख खानचा ३५ वर्षांचा प्रवास
शाहरुख खानने आपला करिअर थिएटर आणि टेलिव्हिजनपासून सुरू केला. १९८९ मध्ये ‘फौजी’ या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. १९९२ मध्ये ‘दीवाना’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘बाझीगर’, ‘डर’, आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे तो रोमॅंटिक हीरो म्हणून ओळखला जाऊ लागला.
जवान’ने गाठली ११०० कोटींची कमाई
कोविडनंतर शाहरुख खानने ‘पठाण’ने यशस्वी पुनरागमन केलं. त्यानंतर आलेल्या एटली दिग्दर्शित ‘जवान’ने जगभरात तब्बल ११४० कोटी रुपयांची कमाई केली. ही शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली. आणि याच चित्रपटासाठी त्याला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विक्रांत मॅसी याला ‘१२वी फेल’ चित्रपटातील सशक्त अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर पुरस्कार देण्यात आला आहे. या दोघांनी मिळवलेला हा पुरस्कार बॉलिवूडसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.