केसातील गजऱ्यामुळे मल्याळम अभिनेत्रीला 1.25 लाखांचा दंड; ओनम उत्सवात नव्या नायरसोबत काय घडलं?

Rohit Shinde

भारतीय संस्कृतीत केसात गजरा माळणे ही सौंदर्य आणि परंपरेची निशाणी मानली जाते. विशेषतः लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्त्रिया फुलांचा गजरा केसात गुंफतात. मोगरा, जाई, कर्दळी यांसारख्या फुलांचा गजरा केवळ शोभा वाढवत नाही तर सुगंधाने मनालाही प्रसन्न करतो. परंतू हीच सवय मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला चांगलीच महागात पडली आहे. केसात गजरा माळल्याने तिला मोठ्या दंडाचा सामना करावा लागला आहे.

केसात गजरा माळ्याने 1.5 लाखांचा दंड

मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती मल्याळी समुदायानं आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला गेली होती. नव्याला मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलानं तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला रोखलं. 15 सेमी लांबीची छोटा गजरा केसाला माळल्यामुळे नव्या नायरला 1980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स सुमारे ₹ 1.25 लाखांचा मोठा दंड भरावा लागला.

नव्यासोबत नेमकं काय घडलं?

नव्यानं कोचीहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात गजऱ्याचा एक भाग केसात माळला, पण सिंगापूरला पोहोचेपर्यंत केसात माळलेला तो गजरा सुकला. तिनं दुसरा तुकडा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवला आणि तो तिच्या हँडबॅगमध्ये ठेवला, जेणेकरून ती सिंगापूर विमानतळावर उतरल्यावर पुन्हा केसाल माळू शकेल. नव्याला माहीत नव्हतं की, अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला फुलं नेणं कायद्याच्या विरोधात आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली, तेव्हा चमेलीची फुलं पाहून त्यांनी तिला थांबवलं आणि लगेच दंड ठोठावला.

ऑस्ट्रेलियाचा जैव-सुरक्षा कायदा या बाबतीत खूप कडक आहे. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सच्या वेबसाइटनुसार, सरकारी परवानगीशिवाय देशात ‘वनस्पती, फुलं आणि बिया’ यांसारख्या जैविक पदार्थांना आणण्यास मनाई आहे. कारण या पदार्थांमुळे कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण होऊ शकतं.  त्यामुळे यानिमित्ताने ऑस्ट्रेलियातील कडक नियमांची आणि कायद्याची प्रचिती आली आहे,

ताज्या बातम्या