दिवाळीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) अचानक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे आणि दक्षिण कोरियन अभिनेता व गायक ली मिन हो यांचे हल्दी समारंभाचे फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
काय आहे फोटोत? Nora Fatehi
या फोटोंमध्ये नोरा आणि ली मिन हो एकत्र दिसत असून दोघांच्याही चेहऱ्यावर हल्दी आणि नोराच्या हातांमध्ये मेहंदी सुद्धा दिसत आहे. नोरा पिवळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात असून दोघंही विविध पोझमध्ये फोटोंमध्ये झळकत आहेत.फोटो पाहून नेटकऱ्यांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली “मॅम, तुम्ही खरंच लग्न करत आहात का?”

व्हायरल फोटोंमुळे नेटकऱ्यांमध्ये गोंधळ
फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की हे फोटो खरे आहेत की केवळ एखाद्या शूटिंगसाठी आहेत. काहींनी प्रश्न केला, “ही माहिती नोराला (Nora Fatehi) आहे का?” तर काहींनी सूक्ष्म निरीक्षण करून म्हटले, “प्रत्येक फोटोमध्ये ड्रेस आणि ज्वेलरी वेगळी आहे. एखाद्याने विनोदात लिहिलं, “AI लग्न, घटस्फोट आणि वाढदिवसासाठी संपर्क करा!” तर दुसऱ्याने थेट लिहिलं, “कसंतरी वाटतंय, हे खरं नाही असं म्हणावं!” अनेकांनी नोरा आणि ली मिन होच्या ‘शादी’च्या अफवांवर प्रतिक्रिया देत सोशल मीडिया भरून टाकलं.
हे फोटो खोटे; नोरा सध्या न्यूयॉर्कमध्ये
नोरा फतेहीच्या टीमकडून अद्याप या फोटोंवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी हे फोटो खोटे (AI जनरेटेड) असल्याचं स्पष्ट झालं आहे. नोरा सध्या न्यूयॉर्कमध्ये असून तिथल्या दिवाळी पार्टीमध्ये तिला अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत पाहिलं गेलं होतं.
‘दिलबर की आंखों का’ गाण्यामुळे चर्चेत
सध्या नोरा फतेही तिच्या नव्या गाण्यामुळेही चर्चेत आहे. ‘दिलबर की आंखों का’, जे आयुष्मान खुराना यांच्या आगामी चित्रपट ‘थामा’ मधील गाणं आहे. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून याच्या बीट्स आणि नोराच्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल फोटोंवर विश्वास ठेवण्याआधी सत्यता तपासणं गरजेचं आहे. नोरा आणि ली मिन होच्या लग्नाच्या अफवा पूर्णपणे खोट्या असून, त्या फक्त AI किंवा मॉर्फिंगच्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आल्या आहेत.











