लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज 05 सप्टेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास ठाणे, वर्तक नगर, येथे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज 05 सप्टेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास ठाणे, वर्तक नगर, येथे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आतापर्यंत निधनाचे नेमके कारण समोर आलेलं नाही. आशिष वारंग अभिनेता रणवीर सिंहसोबत सुर्यवंशी या चित्रपटामध्ये दिसले होते. चाहत्यांमध्ये यामुळे काहीशी शोककळा परसली आहे.

आशिष वारंग यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आणि त्या धक्क्यातून कलाकार, तसेच चाहते मंडळीही अजून सावरले नाहीत. यादरम्यान आणखी एका अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले आहे. मराठी-हिंदी सिनेविश्वातून गाजलेले अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले. ‘सूर्यवंशी’, ‘सर्कस’, ‘मर्दानी’, ‘सिंबा’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका विशेष चर्चेत आल्या होत्या.

मराठी-हिंदी सिनेसष्टीत वारंग यांचे मोठे काम

आशिष यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, राणी मुखर्जी, अजय देवगण, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, आशुतोष राणा, रोहित शेट्टी, जॉन अब्राहम अशा अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. या सर्वांसोबतचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विविध प्रोजेक्टमध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. आशिष मराठी-हिंदीतील विविध जाहिरातींमध्येही झळकले होते.

सिंबा, सूर्यवंशी, दृश्यम, एक व्हिलन रिटर्न्स, मेरी प्यारी बिंदू, हिरोपंती, बॉंबे, सर्कस, मर्दानी या सारख्या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. तर तांडव आणि धर्मवीर सारख्या मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची एक वेगळी छाप सोडली होती. या घटनेमुळे सिने क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News