R Madhavan Look In Dhurandhar : रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर’ या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर मंगळवारी मुंबईत मोठ्या उत्साहात लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटला चित्रपटातील प्रमुख कलाकार रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, तसेच दिग्दर्शक आदित्य धर आणि तांत्रिक टीमचे सदस्य हजर होते. ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या कथानकाच्या भव्यता आणि अॅक्शन सिक्वेन्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ट्रेलर लॉन्चदरम्यान कलाकारांनी चित्रपटाशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी शेअर केल्या. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो अर्जुन रामपालचा खुलासा. त्यांनी सांगितले की ‘धुरंधर’च्या शूटिंगदरम्यान तो आर. माधवनला त्यांच्या लुकमध्ये पाहून ओळखूच शकला नव्हता.
अर्जुन रामपालची आर. माधवनसोबत पहिली फिल्म (R Madhavan Look In Dhurandhar)
अर्जुन रामपाल म्हणाले, “ही माझी आर. माधवनसोबतची पहिली फिल्म आहे. दुर्दैवाने चित्रपटात आमचे एकही दृश्य एकत्र नाही, पण मला एक प्रसंग स्पष्ट आठवतो. मी थायलंडमध्ये पहिल्यांदा सेटवर पोहोचलो तेव्हा एक अभिनेता प्रचंड एकाग्रतेने आपले डायलॉग्स बोलत होता. मी टीमला विचारलं की हा अभिनेता कोण आहे? कारण मी त्याला ओळखलंच नाही. नंतर समजलं की तो मैडी म्हणजेच आर. माधवन होता. त्याचा मेकअप आणि लुक इतका बदललेला होता की मी थक्क झालो. तो चित्रपटात अप्रतिम दिसत आहे.”

यावर प्रतिक्रिया देताना आर. माधवनने (R Madhavan Look In Dhurandhar) सांगितले की, या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी तयार होण्यासाठी दररोज तीन ते चार तासांचा मेकअप व्हायचा. भूमिकेच्या मागणीनुसार लुक घडवण्यासाठी मेकअप आर्टिस्टच्या संपूर्ण टीमला खूप मेहनत करावी लागत होती. माधवनने सांगितले की, ही भूमिका त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होती, परंतु त्यांना हा अनुभव अतिशय खास वाटला.
ट्रेलर लॉन्चच्या वेळी रणवीर सिंहने ‘धुरंधर’च्या कथानकाबद्दल बोलताना सांगितले की हा चित्रपट अतिशय जटिल, अनेक स्तरांनी भरलेला आणि तांत्रिक दृष्ट्या अत्यंत परिपूर्ण आहे. त्यांनी सांगितले, “दिग्दर्शक आदित्य धर यांनी मला जेव्हा ही कथा प्रथमच सांगितली, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. मला विश्वास बसत नव्हता की अशी वास्तविक घटना घडू शकते. भारतासाठी हा जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याचा काळ आहे आणि आम्ही भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने हा चित्रपट तयार केला आहे.”
रणवीर सिंगची दमदार भूमिका-
‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंहची दमदार भूमिका, आर. माधवनचा जबरदस्त मेकअप लुक आणि अर्जुन रामपालचा नकारात्मक अवतार हे प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे. ट्रेलरमधील उच्चस्तरीय व्हिज्युअल्स आणि प्रभावी पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एक थरारक आणि भावनिक प्रवासाचा अनुभव देणार आहे.