बॉलिवूडमधील वादग्रस्त आणि नेहमी चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सध्या ती तिच्या नवीन गाणं ‘जरूरत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान घेतलेल्या तिच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत तिची तुलना अभिनेत्री उर्वशी रौतेलाशी (Rakhi Sawant On Urvashi Rautela) करण्यात आल्यामुळे चांगलीच भडकलेली दिसते. तिच्या त्या विधानावर चाहत्यांकडून आणि नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मी उर्वशी सारखं खोटं बोलत नाही –
या प्रमोशन इव्हेंटमध्ये राखीने भडक रंगाचा लहंगा-चोली परिधान केला होता आणि तिच्यावर लक्षवेधी दागिन्यांची सजावट करण्यात आली होती. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तिच्या डोक्यावर घातलेल्या दागिन्यांची किंमत तब्बल 50 कोटी रुपये आहे, तर गळ्यातील हाराची किंमत सुमारे 20 कोटी आहे. यानंतर तिने स्वतःच्या खास शैलीत म्हणाली, “मी उर्वशी रौतेलासारखी खोटं बोलत नाही, जे घातलंय ते खरंच इतकं महाग आहे.”

यावेळी पत्रकारांनी तिला विचारलं की, “तुम्ही उर्वशी रौतेलाला तुमची स्पर्धक मानता का?” या प्रश्नावर राखी सावंत चांगलीच चिडली आणि तिच्या नेहमीच्या बिनधास्त अंदाजात उत्तर दिलं “तुमचं काय, दिमाग गुडघ्यात आहे का? माझी तुलना उर्वशी रौतेलाशी करू नका. माझी तुलना ब्रिटनी स्पीयर्स, जेनिफर लोपेज, शकीरा, पॅरिस हिल्टन आणि किम कार्दशियन यांच्याशी करा. तुम्हाला सगळ्यांना एकच नाव का सापडतं? Rakhi Sawant On Urvashi Rautela
राखीने उडवली उर्वशीची खिल्ली
राखीने इथेच थांब न घेता उर्वशी रौतेलाच्या ‘दाबिडी दिबिडी’ या गाण्याचं नाव घेत त्याची खिल्ली उडवली. ती म्हणाली, “तिचं गाणं होतं ‘दाबिडी दिबिडी’, पण ऐकल्यावर वाटलं की दाबिडीचं दाबडं झालं!” एवढं बोलताच ठिकाणची लाईट अचानक गेली, त्यावर राखीने हसत प्रतिक्रिया दिली, “इतकं मनहूस गाणं होतं का की नाव घेताच लाईट गेली? या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेडिट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून, काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला आहे. सोशल मीडियावर काहीजण राखीच्या बिनधास्त बोलण्याचं आणि तिच्या विनोदी टायमिंगचं कौतुक करत आहेत, तर काहींनी तिला पुन्हा एकदा “ड्रामा क्वीन” म्हणून हिणवलं आहे.
राखी सावंत नेहमीच आपल्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे ती अनेकदा वादातही सापडते. तरीदेखील, तिचा आत्मविश्वास आणि स्वतःची वेगळी ओळख जपण्याची वृत्ती तिला इतरांपासून वेगळी ठरवते.
दरम्यान, राखीचं नवीन गाणं ‘जरूरत’ नुकतंच रिलीज झालं असून, त्याला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळत आहे. राखीचा ठसकेबाज डान्स आणि रंगीबेरंगी अंदाज चाहत्यांना आवडतो आहे. या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान घडलेला हा प्रसंग मात्र इंटरनेटवर नवीन चर्चा रंगवून गेला आहे. राखी सावंतचं व्यक्तिमत्त्व नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस, वादग्रस्त आणि मनोरंजक राहिलं आहे. ती काहीही बोलली की, तिचं विधान हेडलाईन बनतंच आणि या वेळीही तिची उर्वशी रौतेलावरील टिप्पणी सोशल मीडियावर चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.











