Ram Gopal Varma : “मी स्वतःला एक थप्पड मारली…” ‘मिराय’ पाहून राम गोपाल वर्मा असं का म्हणाले?

सुरुवातीला त्यांना वाटत होतं की अभिनेता मनोज मंजुनाथ खलनायकाच्या भूमिकेसाठी योग्य नाहीत. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच्याच विचारांवर शंका घेतली आणि लिहिलं, "फिल्ममधील व्हिलनची भूमिका पाहून मी स्वतःला एक थप्पड मारली.

अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘मिराय’ (Mirai) हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. १२ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चर्चांमध्ये आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ‘मिराय’ चित्रपटाची भरभरून स्तुती केली आहे. त्यांनी विशेषतः चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), कलाकारांचा अभिनय, आणि दिग्दर्शन यांची प्रशंसा केली आहे.

काय म्हणाले राम गोपाल वर्मा – Ram Gopal Varma 

राम गोपाल वर्मा म्हणाले, “खूप दिवसांनंतर इतकं भव्य VFX पाहायला मिळालं, जे अनेकदा ४०० कोटींच्या बजेटच्या चित्रपटांमध्येही दिसत नाही. सुरुवातीला त्यांना वाटत होतं की अभिनेता मनोज मंजुनाथ खलनायकाच्या भूमिकेसाठी योग्य नाहीत. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच्याच विचारांवर शंका घेतली आणि लिहिलं, “फिल्ममधील व्हिलनची भूमिका पाहून मी स्वतःला एक थप्पड मारली.”

तेज साज्जा यांच्याबाबतही सुरुवातीला शंका होती, पण त्यांच्या अभिनयाने वर्मा (Ram Gopal Varma) यांनाही प्रभावित केलं. “इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या अ‍ॅक्शन चित्रपटात ते कितपत सक्षम असतील, याबद्दल माझी शंका होती. पण त्यांचं काम पाहिल्यावर ती पूर्णपणे दूर झाली,” असं त्यांनी नमूद केलं. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या कार्तिक गट्टा यांच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. त्यांनी लिहिलं, “हा चित्रपट म्हणजे एक सुंदर स्वप्न आहे. यात पौराणिकता, नायकत्व आणि ओरिजनल कथानकाचं सुंदर मिश्रण आहे.”

मिराय भव्य चित्रपट –

चित्रपटात ऍक्शन, तलवारबाजी, जादू, आणि अलौकिक घटक असूनही *परिवार, प्रेम, जबाबदारी आणि विश्वासघात या मानवी भावनांनाही चपखलपणे हाताळलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘मिराय’ हा ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला एक भव्य चित्रपट आहे, जो खरोखरच मोठा वाटतो. फक्त दावा नाही, तर अनुभवही तसाच आहे. प्रेक्षकांचा प्रेमळ प्रतिसाद हाच त्याचा खरा सन्मान असल्याचं राम गोपाल वर्मा यांनी नमूद केलं.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News