मी स्वत: भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे, मुंबईत भाजपचाच महापौर बसेल असे विधान केल्यानंतर मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यावर अनेक जण टीका करत आहेत. आता छत्रपती संभाजीनगरच्या रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांना फोन (Ramesh Patil Phone Call To Mahesh Kothare) केला आहे. तुम्हाला ED ची नोटीस आली आहे का? असा सवाल रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांना केला. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालं आहे.
काय म्हणाले रमेश पाटील? Ramesh Patil Phone Call To Mahesh Kothare
रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांना फोन करत थेट सवाल केला की साहेब, तुम्ही काल मोदींचा भक्त आहे असं म्हणालात, तुम्हाला ईडीचे नोटीस वगैरे आले आहे का?? आपण, कलाकार आहोत, तरी असे विधान केलं….. यावर उत्तर देताना महेश कोठारे यांनी म्हटले की, का नाही बोलणार.. मोदींनी देशासाठी एवढा मोठ काम केलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चे काम जे याआधी कधी झाले नाहीत, ती कामे मोदींनी केली आहेत. त्या माणसाची कोणी दखल घ्यायची नाही का?? त्या माणसाने आपलं सर्वस्व देशासाठी वाहिले आहे. ते स्वतःसाठी काहीच करत नाही, सगळं देशासाठी करतोय अस म्हणत महेश कोठारे यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं. Ramesh Patil Phone Call To Mahesh Kothare

राऊतांचा महेश कोठारेंवर निशाणा
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल राऊतानी केला. . ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनीच बघितले नाहीत. तुम्ही जर असे काही बोलत राहिला तर त्यात्या विंचू रात्री येऊन तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल, अशा शब्दात संजय राऊतांनी महेश कोठारेला सुनावल.











