Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूरचा मटण खातानाचा Video व्हायरल; सोशल मीडियावर युजर्स कडून कानपिचक्या; म्हणाले ‘रामायण’ साठी नॉनव्हेज…

Asavari Khedekar Burumbadkar

Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही काळापूर्वी अशी बातमी समोर आली होती की नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीरने नॉनव्हेज सोडले आहे. या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारत असून, त्यासाठी ते सात्त्विक जीवनशैली स्वीकारत असल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे तर त्यांनी स्मोकिंगही सोडली असून, नियमित ध्यान, सकाळची वर्कआउट आणि अनुशासित दिनचर्या सुरू केल्याचेही म्हटले गेले होते.

काय आहे व्हिडिओत Ranbir Kapoor Viral Video

परंतु आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे रणबीर ट्रोल्सच्या निशाण्यावर आले आहेत. ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये रणबीर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह लंच करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये रणबीरच्या चुलत भावाने अरमान जैनने फिश करी, भात आणि जंगली मटण सर्व्ह केलेले दिसते. रणबीरसोबत नीतू कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, रीमा जैन आणि सैफ अली खानही या लंचमध्ये उपस्थित होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ झपाट्याने पसरत असून अनेक यूजर्सने रणबीरवर टीका सुरू केली आहे. Ranbir Kapoor Viral Video

नेटकरी काय म्हणाले?

काही यूजर्सचे म्हणणे आहे की रणबीरने रामायणसाठी नॉनव्हेज सोडल्याच्या बातम्या केवळ पब्लिसिटी स्टंट होत्या. एका यूजरने लिहिले की रणबीरच्या पीआर टीमने असे विधान केले होते की त्यांनी भगवान रामाच्या भूमिकेचा सन्मान म्हणून नॉनव्हेज सोडले आहे, परंतु आता व्हिडिओमध्ये ते फिश करी, मटण आणि पाया खाताना दिसत आहेत. त्यामुळे रणबीरकडे बॉलिवूडमध्ये मजबूत पीआर असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, रणबीर कपूरची ‘रामायण’ ही फिल्म दोन भागांत रिलीज होणार आहे. या चित्रपटात सई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहेत, तर अभिनेता रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावरील वाद वाढत असताना चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र तितकीच वाढत आहे.

ताज्या बातम्या