Rashmika Engagement Rumors : रश्मिका मंदानाचा साखरपुडा झाला?? त्या व्हिडिओने वेधलं लक्ष

Asavari Khedekar Burumbadkar

अभिनेत्री रश्मिका मंदाना नुकतीच दुबईमध्ये झालेल्या साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA 2025) मध्ये सहभागी झाली होती. यावेळी रश्मी कासार एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये तिच्या हातात दिसत आहे अनामिका बोटातल्या घातलेल्या या अंगठी मुळे रश्मीकाने साखरपुडा तर केला नाही ना ?? (Rashmika Engagement Rumors) या चर्चांना उधाण आलं आहे. रश्मिका दीर्घकाळापासून अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचीही चर्चा होती, त्यामुळे या सेलिब्रिटी कपलने त्यांच्या नात्यात पुढचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते आहे. चाहत्यांनी तर दोघांचे अभिनंदन करण्यासही सुरुवात केली आहे.

काय आहे व्हिडिओत?? Rashmika Engagement Rumors

रश्मिका मंदानाचे दुबईमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये रश्मिका कारमध्ये बसताना दिसतेय आणि काही फोटो तिचे दुबईमध्ये हॉटेलच्या दिशेने जातानाचे दिसत आहेत. या दोन्ही फोटो वेळी रस्मिकाच्या बोटात ही अंगठी दिसून आली मात्र ज्या पुरस्कार सोहळ्यात ती सहभागी झाली तेव्हा मात्र तिच्या हातात ही अंगठी कुठे दिसत नाही.

रश्मिकाच्या अंगठी चे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. एका रेडिट वापरकर्त्याने लिहिले, “आता ती रश्मिका देवेरकोंडा असेल.” दुसऱ्या नेटिझनने लिहिले, “फ्यूचर मिसेस लिगर.” तर आणखी एका रेडिट वापरकर्त्याने टिप्पणी दिली, “मला वाटले की ती एका चांगल्या मुलाची वाट पाहेल, पण दोघांचेही अभिनंदन.”

बऱ्याच दिवसांपासून डेटिंगच्या बातम्या

खरं तर रश्मिका आणि विजय यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. परंतु अजूनही, दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मात्र तरीही जेव्हा अनेकदा हे कपल फोटो शेअर करते तेव्हा तेव्हा चाहते असा अंदाज लावतात की ते एकत्र बाहेर जात आहेत.

सध्या काय करते रश्मिका

दरम्यान, रश्मिका मंदाना च्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झाल्यास,  सध्या तिच्याकडे थामा, रेनबो, द गर्लफ्रेंड, मायसा और कॉकटेल 2 सारख्या चित्रपटांची कामे आहेत. यावर्षी दिवाळीला ‘थामा’ प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, विजयकडे ‘व्हीडी१४’ आणि ‘एसव्हीसी ५९’ सारखे चित्रपट आहेत.

ताज्या बातम्या