रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली ? राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्नाचे नियोजन ?

काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता थेट त्यांच्या लग्नाची तारीख ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या टॉलीवूडमधील लोकप्रिय जोडीबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दोघांचा गुपचूप साखरपुडा झाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांमध्ये लग्नाच्या तारखेची उत्सुकता वाढली असून, अनेकांनी अभिनंदनाचे संदेश देण्यास सुरुवात केली आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले असून त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आता थेट त्यांच्या लग्नाची तारीख ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे. शिवाय, दोन्ही कलाकारांनी लग्नासाठी राजस्थान या लोकेशनची निवड केल्याचंही बोललं जात आहे.

रश्मिका-विजयच्या लग्नाची तारीख फिक्स ?

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 मध्ये राजस्थानातील उदयपूर इथल्या एका आलिशान राजवाड्यात होणार आहे. दरम्यान, अद्याप रश्मिका मंदाना किंवा विजय देवरकोंडा यांच्याकडून याबाबक कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, दोघांच्या लग्नाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी साखरपुड्याची चर्चा, आता थेट लग्नाची…

गेल्या महिन्यात विजय आणि रश्मिकाचा विवाह साखरपुडा विजयच्या हैदराबादच्या घरी झाला होता, अशी माहिती समोर आलेली. या विवाह सोहळ्याला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. ‘थामा’च्या प्रमोशन दरम्यान, रश्मिकान हिंट दिलेली की, दोघांनीही साखरपुडा उरकला आहे आणि खूप आनंदी आहेत. विजयच्या टीमनं देखील पुष्टी केलेली की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. रश्मिकानं सांगितलेलं की, सर्वांना याबद्दल माहिती आहे. विजयच्या टीमनं असंही लिहिलेलं की, हे जोडपं पुढच्या वर्षी, कदाचित फेब्रुवारीमध्ये लग्न करण्याचा विचार करत आहेत.

रश्मिका आणि विजय नावाजलेले कलाकार

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नावाजलेले आणि लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांनीही आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रश्मिकाने गीता गोविंदम, पुष्पा सारख्या सुपरहिट चित्रपटांतून खूप लोकप्रियता मिळवली, तर विजय देवरकोंडाने अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड आणि लायगर सारख्या चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे खरंच ही जोडी लग्नगाठ बांधते का, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News