Rashmika Mandanna Engagement : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा गुपचूप साखरपुडा? लग्नाची तारीखही आली समोर

Asavari Khedekar Burumbadkar

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि चाहत्यांच्या विशेष आवडीच्या जोड्यांपैकी एक म्हणजे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. कधी हे दोघं एकत्र एअरपोर्टवर स्पॉट होतात, तर कधी कोणत्या पार्टीत किंवा फंक्शनमध्ये. एवढंच नाही, तर अनेकदा रश्मिका विजयचे कपडे  म्हणजे टी-शर्ट किंवा कॅप  परिधान करतानाही दिसून आली आहे. त्यामुळे त्यांच्या जवळीकतेबाबत अनेकांनी अंदाज लावले होते. या सर्व चर्चांनंतरही दोघांनी आपल्या नात्याबाबत अधिकृतरित्या कधीच काहीही कबूल केलं नव्हतं. मात्र, आता अशी माहिती समोर आली आहे की या दोघांनी गुपचूप साखरपुडा (Rashmika Mandanna Engagement) केला आहे, आणि ती बातमी आता संपूर्ण इंडस्ट्रीमधील चर्चेचा विषय बनली आहे.

गुप्ततेत पार पडलेला साखरपुडा – Rashmika Mandanna Engagement

एम९या प्रसिद्ध ऑनलाइन पोर्टलच्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अत्यंत खासगी पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. हा सोहळा कोणत्याही गाजावाजाशिवाय पार पडला. दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी या वेळी उपस्थित होते. या समारंभात दोघांनी एकमेकांना साखरपुडा अंगठ्या घालून आपलं प्रेम आणि एकत्र आयुष्य जगण्याचं वचन दिलं. या सोहळ्याची कोणतीही झलक (Rashmika Mandanna Engagement)सोशल मीडियावर समोर आलेली नाही, आणि नेमकी ही माहिती कशी बाहेर आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तरीही, साखरपुड्याची बातमी चाहत्यांमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे.

लग्नाच्या तयारीला सुरुवात, तारीखही ठरली!

मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चानुसार, रश्मिका आणि विजय पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२६ मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्न पारंपरिक पद्धतीने आणि दक्षिण भारतीय रीतिरिवाजांनुसार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरू झाल्याचीही माहिती काही माध्यमांद्वारे समोर आली आहे. विवाहस्थळ, कपडे, यादी, पाहुणे इत्यादींबाबत सध्या सगळं नियोजन गुप्तपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे. हे लग्न फिल्म इंडस्ट्रीतील एक भव्य सोहळा ठरणार, अशीही चर्चा आहे.

रश्मिका आणि विजय यांची लव्ह स्टोरी

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची प्रेमकथा सुरुवातीला सेटवरूनच सुरू झाली. २०१८ मध्ये आलेल्या ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं आणि त्यातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये ‘डिअर कॉमरेड’ या चित्रपटातही एकत्र भूमिका केली. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर त्यांच्यातील जवळीक वाढल्याचं म्हणतात. त्या काळापासूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आलं होतं. दोघंही एकमेकांविषयी आदराने बोलत होते, परंतु प्रेमसंबंधाबाबत नेहमीच मौन बाळगत होते.

ताज्या बातम्या