साउथ सिनेमाची लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. अलीकडेच अशा अफवा पसरल्या होत्या की रश्मिकाने अभिनेता विजय देवरकोंडासोबत सगाई केली असून लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या सर्व चर्चांदरम्यान रश्मिकाने आपल्या आगामी चित्रपट ‘थामा’ मधील पहिल्या गाण्याची झलक इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे. गाण्याचे नाव आहे ‘तुम मेरे ना हुए’. ही पोस्ट शेअर करताना रश्मिकाने या गाण्याच्या शूटिंगमागील एक खास किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
गाण्याच्या शूटिंगमागील किस्सा
रश्मिकाने लिहिले की, “आम्ही 10-12 दिवस एक अप्रतिम ठिकाणी शूटिंग करत होतो. शेवटच्या दिवशी आमच्या दिग्दर्शक व निर्मात्यांना अचानक एक भन्नाट कल्पना सुचली आपण इथे एक गाणं का शूट करू नये? ही लोकेशन खूप सुंदर आहे! मग आम्ही 3-4 दिवसांत गाणं पूर्ण केलं. जेव्हा शेवटी हे गाणं तयार झालं, तेव्हा आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो.”

टीमचे आभार मानले – Rashmika Mandanna
गाण्याच्या यशासाठी रश्मिकाने आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. तिने लिहिले की, “सर्व डान्सर्स, कॉस्ट्यूम टीम, सेटवर काम करणारे लोक, लाइट्स डिपार्टमेंट, डायरेक्शन आणि प्रॉडक्शन टीम सर्वांना माझा मोठा शाऊटआउट! हे गाणं तुमच्या मेहनतीमुळेच शक्य झालं. तिने आपल्या चाहत्यांना “तडका” आणि “आलोक” या भूमिकांशी जुळवून घेण्याचे, त्यांच्यावर प्रेम करण्याचे आवाहन केले.
जरी ही पोस्ट पूर्णपणे व्यावसायिक असली, तरीही कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी रश्मिकाच्या (Rashmika Mandanna) वैयक्तिक आयुष्याबाबतच प्रश्न विचारले. अनेकांनी विचारले “साखरपुड्याचा फोटो कधी शेअर करणार?”, “खरंच सगाई झाली का?”, “प्लीज, कन्फर्म कर रश्मिका. हे पाहता स्पष्ट होते की, चाहत्यांना रश्मिकाच्या अभिनयाइतकीच तिच्या आणि विजय देवरकोंडाच्या नात्याची उत्सुकता आहे.
‘थामा’मध्ये दमदार भूमिका
रश्मिका मंदाना ‘थामा’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर, गाणे आणि रश्मिकाचा लूक आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता चाहत्यांना या गाण्याचा आणि चित्रपटाचा आणखी किती प्रभाव पडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.