Satish Shah Death: सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन

'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं आहे. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतिश शाह यांचं वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं आहे. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. या बातमीनं संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला असून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत. अपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविले.

 सतीश शाहांच्या निधनाने अनेकांना धक्का

अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे, चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ते बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते. तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जातं,आणि त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते. तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सतीश शाहांच्या अनेक संस्मरणीय भूमिका

सतिश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मध्ये इंद्रवर्धन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखलं जातं, या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयानेप्रेक्षकांचं मन जिंकलं. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ हा एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप कॉमेडी शो होता आणि आजही, त्यातील व्हिडिओ क्लिप्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सतिश शाह यांचा जन्म गुजरातमधील मांडवी येथे झाला आणि त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचा अभ्यास केला आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत करीअर साकारले होते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News