Rowdy Rathore 2 : राऊडी राठोड 2’ मधून अक्षय कुमारची OUT? ‘खिलाडी’च्या जागी दिसणार पॅन इंडिया स्टार!

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुपरहिट अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट ‘राऊडी राठौर’चा सिक्वेल (Rowdy Rathore 2) तयार होण्याची चर्चा जोरात सुरू आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही विशेष स्थान राखून आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी आता ‘राऊडी राठोड 2’ बनवण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे की या चित्रपटात अक्षय कुमार दिसणारच नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भन्साळी प्रॉडक्शन्सने या हिट चित्रपटाला आता एका मोठ्या फ्रँचायझीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘राऊडी राठौर 2’सह स्टुडिओ अनेक मोठ्या प्रकल्पांवर सक्रियपणे काम करत आहे. ही फ्रँचायझी देशभरात प्रचंड लोकप्रिय असून तिचा पॅन इंडिया फॅन बेस खूप मजबूत आहे.

पॅन इंडिया स्टार मुख्य भूमिकेत (Rowdy Rathore 2)

सध्या चित्रपटाची निर्मिती सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि कलाकारांची निवड अजून अंतिम झालेली नाही. परंतु अहवालांनुसार ‘राऊडी राठोड 2’मध्ये अक्षय कुमारच्या जागी एका मोठ्या पॅन इंडिया स्टारला लीड रोलमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे. चित्रपटाच्या लोकप्रियतेचा आणि त्याच्या ब्रँड व्हॅल्यूचा विचार करून निर्मात्यांनी नव्या स्टारकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. (Rowdy Rathore 2)

रावडी राठोड ची जबरदस्त कमाई

पहिल्या भागात अक्षय कुमारसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसली होती. प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट 2006 च्या तेलुगु चित्रपट ‘विक्रमारकुडू’चा हिंदी रिमेक होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आणि तो बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा सुपरहिट ठरला.

दरम्यान, अक्षय कुमार लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात झळकणार आहेत. ही फिल्म ‘वेलकम’ (2007) आणि ‘वेलकम बॅक’ (2015)नंतर या लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. ‘वेलकम’ चित्रपटाला त्याच्या विनोद, स्टारकास्ट आणि मनोरंजनासाठी कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला होता. ‘वेलकम 3’ची रिलीज डेट मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. सध्या चित्रपटसृष्टीत सगळ्यांचे लक्ष एका प्रश्नाकडे आहे  ‘राऊडी राठोड’ 2’मध्ये नेमका कोण अभिनेता अक्षय कुमारची जागा घेणार? याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि सर्वजण अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्या