अमेरिकेच्या टेरिफ वॉर मुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आधीच टीकेचे धनी बनले आहेत. ट्रम्प यांच्या धोरणावरून सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जातेय…. त्यातच भारत पाकिस्तान युद्ध मीच रोखले असे ते सातत्याने सांगत असतात… रशिया युक्रेन युद्धातही आपण मध्यस्ती कशी हे दाखवण्याचाही त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ट्रम्प यांचा हा सर्व खटाटो हा नोबेल साठी चाललाय अशा चर्चा सुरू असतात… आता याच सर्व एकूण पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता सलमान खानने बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये ट्रम्प यांच्यावर (Salman Khan On Donald Trump) नाव न घेता निशाणा साधला आहे.
काय म्हणाला सलमान खान – Salman Khan On Donald Trump
शनिवारी रात्रीच्या एपिसोडमध्ये सलमान खानने स्पर्धकांना फटकारलेच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान केले.शोमधील स्पर्धकांमधील भांडणांवर चर्चा करताना सलमानने सांगितले की जगभरात काय चालले आहे. जे सर्वात जास्त समस्या पसरवत आहेत त्यांनाच शांतता पुरस्कार मिळण्याची अपेक्षा आहे. सलमान खानने यावेळी कोणाचेही थेट अस नाव घेतलं नसले तरी त्याचा रोख हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरच असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
कारण अलिकडच्या काही महिन्यांत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला आहे की त्यांनी भारत-पाकिस्तान आणि इस्रायल- पॅलेस्टाईन सारखे वाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु या देशांनी त्यांचे दावे वारंवार नाकारले आहेत. तरीही, ट्रम्प यांचे समर्थक त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सलमानचे विधान या दाव्यांवरच मानले जात आहे. (Salman Khan On Donald Trump)
सोशल मीडियावर चर्चा
सलमान खानने ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्यानंतर सोशल मीडियावर एकामागून एक प्रतिक्रिया येऊ लागल्या. ट्विटरवरील एका युजर्स ने विनोदाने लिहिले, ‘सलमान बातम्या पाहतो का? मला कधीच असे वाटले नव्हते.’ दुसऱ्या एका चाहत्याने रेडिटवर क्लिप शेअर केली आणि लिहिले, ‘सलमान भाई बिग बॉसमध्ये ट्रम्पवर टीका करत आहेत.’ काही वापरकर्त्यांनी विनोद केला की ते ट्रम्पच्या उत्तराची वाट पाहत आहेत.











