Smriti Mandhana Palash Muchhal wedding: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल २३ नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार होते.परंतु स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा होताना दिसत आहेत. लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंदानाने तिच्या सोशल मीडियावरून लग्नापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ हटवले आहेत. केवळ मंदानाच नाही तर तिच्या मैत्रिणींनीही त्यांच्या सोशल मीडियावरून लग्नापूर्वीच्या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ काढून टाकले आहेत.

चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल-
सोशल मीडियावरून फोटो काढून टाकल्यानंतर, असा दावा केला जात आहे की पलाशने स्मृतीला फसवले आहे आणि त्याचे मेरी डि’कोस्टा नावाच्या कोरिओग्राफरसोबत प्रेमसंबंध आहेत. हे संगीत समारंभाच्या रात्री स्मृतीला समजले. पलाश आणि मेरी यांच्यातील एक चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
आता संपूर्ण प्रकरणात एक नवीन नाव समोर आले आहे. रेडिटवरील एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की संगीताच्या रात्री स्मृतीची मैत्रिणी श्रेयंका पाटीलने पलाशला कोणासोबत तरी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडिया पोस्टमध्ये महिलेची ओळख नंदिका द्विवेदी अशी झाली आहे.
कोण आहे नंदिका द्विवेदी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंदिका एक कोरिओग्राफर आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि सध्या ती मुंबईत कोरिओग्राफर म्हणून काम करते. तिने अनेक म्युझिक व्हिडिओ कोरिओग्राफ केले आहेत.
तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार, नंदिका एक वैयक्तिक प्रशिक्षक आणि कोरिओग्राफर आहे. पलाश आणि स्मृतीच्या लग्नासाठी नंदिकादेखील सांगलीला आली होती. परंतु, नंदिकाचे इंस्टाग्राम खाजगी आहे आणि सोशल मीडियावरील दाव्यांपेक्षा, नंदिका आणि पलाश यांच्यात इतर कोणताही संबंध आढळलेला नाही.
पलाशने स्मृती मंदानाला फसवले का, की लग्न पुढे ढकलण्यामागे दुसरे काही कारण होते? सध्या, दोन्ही पक्षांकडून अधिकृत विधान आलेले नाही. परंतु, सोशल मीडियावर केले जाणारे दावे आणि अफवा पूर्णपणे नाकारता येत नाहीत. मंदानाने सोशल मीडियावरून लग्नापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ हटवल्याने आणि पलाशच्या व्हायरल चॅटमुळे या अफवांना आणखी हवा मिळाली आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)