Sonakshi Sinha : लग्नाच्या 16 महिन्यांनंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा नवऱ्याबद्दल मोठा खुलासा म्हणाली…

एका खास संवादात सोनाक्षी म्हणाली की, माझा विश्वास नेहमीच हाच राहिला आहे की प्रेम हे सगळ्यांवर मात करतं. लोक काय बोलतात, कोण टीका करतो, याने काही फरक पडत नाही.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी अभिनेता जहीर इक्बालसोबत सिव्हिल मॅरेज करून सोनाक्षीने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 महिने उलटले आहेत आणि या काळात त्यांच्या नात्याबद्दल, सोनाक्षीच्या वैयक्तिक निर्णयांबद्दल आणि कुटुंबाच्या भूमिकेबद्दल अनेक अफवा पसरल्या. मात्र, अखेर सोनाक्षीने शांतता सोडून तिच्या आयुष्याबद्दल आणि जहीरसोबतच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली सोनाक्षी ? Sonakshi Sinha

एका खास संवादात सोनाक्षी म्हणाली की, माझा विश्वास नेहमीच हाच राहिला आहे की प्रेम हे सगळ्यांवर मात करतं. लोक काय बोलतात, कोण टीका करतो, याने काही फरक पडत नाही. शेवटी जिंकतं ते प्रेमच. मी माझ्या मनाचा आवाज ऐकला आणि ज्याच्यावर मी खऱ्या अर्थाने प्रेम करते, त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. ती पुढे म्हणाली की, लोक मला म्हणतात ‘तू खूप धाडसी आहेस’, पण मला तसं वाटत नाही. जेव्हा एखादी गोष्ट मनापासून योग्य वाटते, तेव्हा ती करायलाच हवी. हे सगळं माझ्या आयुष्यात नैसर्गिकरित्या घडलं. मी काही मुद्दाम प्रसिद्धीसाठी किंवा हट्टाने काहीच केलं नाही.

सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि जहीरची लव्ह स्टोरी बॉलिवूडमध्ये फार थोड्या लोकांना माहिती होती. त्यांच्या ओळखीचा धागा सलमान खानच्या घरातील एका पार्टीत जोडला गेला. त्या रात्री दोघांनी बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या आणि त्या गप्पा पुढे एक सुंदर नात्यात रूपांतरित झाल्या. काही वर्षं दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2024 मध्ये सोनाक्षी आणि जहीरने सिव्हिल मॅरेज करून आयुष्यभरासाठी एकमेकांचे हात धरले. त्यांच्या लग्नावेळी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनीही आपल्या लेकीच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला होता.

लग्नानंतर सोनाक्षीबद्दल अनेक अफवा

… ती मुस्लिम धर्म स्वीकारणार का, ती गरोदर आहे का इत्यादी. सोशल मीडियावरही यावरून ट्रोलिंग झाली. मात्र सोनाक्षीने या सर्व चर्चांवर हसत प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली की, लोक माझ्याबद्दल रोज नवनव्या गोष्टी लिहितात. काही दिवसांपूर्वी तर म्हणाले की मी गेल्या 16 महिन्यांपासून प्रेग्नंट आहे! मला त्यावर हसायचं की रडायचं, हेच कळत नाही. पण खरं सांगायचं तर मी या गोष्टी मनावर घेत नाही. लोकांना बोलायचं असतं, ते बोलतात. मला माझं आयुष्य जगायचं आहे.

सध्या सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि जहीर मुंबईतल्या एका आलिशान घरात एकत्र राहतात. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. चाहत्यांना त्यांच्या नात्यातील सहजता आणि एकमेकांबद्दलचं आदर पाहायला मिळतो. दोघे अनेकदा एकत्र प्रवास करतात, शूटिंगदरम्यान एकमेकांना सपोर्ट देतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात. सोनाक्षीच्या मते, आमचं नातं सगळ्यांसारखं नाही, पण खूप प्रामाणिक आहे. आम्ही दोघे एकमेकांचे सर्वोत्तम मित्र आहोत.

वैयक्तिक आयुष्याबरोबरच सोनाक्षीचं करिअरही सध्या चांगल्या उंचीवर आहे. ती काही नव्या वेबसीरिज आणि चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, जहीर इक्बालही काही नव्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. दोघंही एकमेकांच्या यशाचा अभिमान बाळगतात. सोनाक्षी शेवटी म्हणाली की, प्रेम ही भावना कोणत्याही धर्मापलीकडची, जातीपलीकडची आहे. माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचं हेच मी ठरवलं आहे. आणि मला खात्री आहे. शेवटी जिंकणारं प्रेमच असतं.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News