Sonu Sood : Indigo उड्डाण संकट गहिरेच, प्रवाशांचा संताप वाढत असताना सोनू सूदची संयमाची साद

देशातील सर्वात मोठ्या विमान सेवा देणाऱ्या इंडिगोवर गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व ऑपरेशनल संकट कोसळले आहे. उड्डाणे रद्द होणे, तासन्तास विलंब, प्रवासी विमानतळावर अडकून पडणे आणि तांत्रिक टीमपासून कॅबिन क्रूपर्यंत सर्वांच्याच क्षमतेवर ताण येत आहे

Sonu Sood : देशातील सर्वात मोठ्या विमान सेवा देणाऱ्या इंडिगोवर गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व ऑपरेशनल संकट कोसळले आहे. उड्डाणे रद्द होणे, तासन्तास विलंब, प्रवासी विमानतळावर अडकून पडणे आणि तांत्रिक टीमपासून कॅबिन क्रूपर्यंत सर्वांच्याच क्षमतेवर ताण येत आहे. विमान कंपनीत निर्माण झालेल्या या अचानक कोलमडलेल्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचा संतापही उसळायला लागला आहे. अशा परिस्थितीत अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद पुढे आला आहे. त्यांनी भावनिक संदेश देत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

नव्या नियमांचा फटका, पायलटांची मोठी कमतरता

नोव्हेंबरपासून लागू झालेल्या पायलट ड्युटी आणि विश्रांतीसंदर्भातील नव्या, अधिक कडक नियमांचे पालन करण्यामध्ये सुरुवातीचे मोठे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय चुका झाल्या. या नियमांनुसार पायलटांना अधिक विश्रांतीची गरज असून, शेड्यूलिंगमध्ये अधिक काटेकोरपणा आवश्यक आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यातील गैरसमज आणि चुकीच्या नियोजनामुळे पायलट मोठ्या प्रमाणात उपलब्धच राहिले नाहीत. पायलटांच्या कमतरतेमुळे अनेक विमानं उड्डाणासाठी तयार असतानाही त्यांना उड्डाण करणे शक्य झाले नाही.

या गोंधळामुळे एकाच दिवसात अनेक उड्डाणे रद्द झाली, काही तासन्तास विलंबाने निघाली आणि प्रवाशांना कोणतीही निश्चित माहिती न मिळाल्याने संताप वाढला. विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ज्यांचे लग्नाचे कार्यक्रम होते, महत्त्वाच्या मिटिंग्ज होत्या, परदेशातून ट्रान्झिट करायचे होते—ते सर्वजण अडचणीत सापडले.

सोनू सूदने सांगितला स्वतःचा अनुभव, भावनिक आवाहन (Sonu Sood)

या परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने ‘X’ वर व्हिडिओ शेअर करीत विमानतळावरील वास्तव समोर आणले. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. “माझं कुटुंब चार ते साडेचार तास विमानतळावर अडलं होतं. उड्डाणांची स्थिती पाहून मलाही धक्का बसला. अनेक लोकांचा महत्वाचा दिवस वाया जाताना दिसला,” असे त्यांनी सांगितले. पण त्यांना सर्वात त्रासदायक गोष्ट वाटली ती म्हणजे काही ठिकाणी प्रवाशांकडून कर्मचाऱ्यांवर होणारा संताप. “लोक कर्मचारी वर्गावर ओरडत आहेत, त्यांच्यावर चिडत आहेत. पण प्रत्यक्षात हे कर्मचारीही काही करू शकत नाहीत. तेही कंपनीच्या निर्णयांमुळे अडचणीत आहेत,” असे सूद म्हणाले. Sonu Sood

आपल्या खास शैलीत सोनूने नागरिकांना संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याचे आवाहन केले. तो म्हणाला “ही परिस्थिती कोणाच्याही नियंत्रणात नाही. कर्मचारीही दिवसरात्र काम करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी कोणी कोणावर राग काढण्यापेक्षा आपण जबाबदार नागरिक बनू, गुस्सा नियंत्रणात ठेवू आणि शक्य तेवढा सहयोग करू.”

इंडिगोची प्रतिक्रियाही मर्यादित, प्रवाशांची चिंता वाढती

इंडिगोने परिस्थिती सुधारण्यासाठी पायलट पुनर्संयोजन, तातडीचे उपाय, ग्राहकांना मेसेजद्वारे अपडेट्स देणे यांसारखे प्रयत्न सुरू केले आहेत. पण उड्डाणांची मोठी संख्या आणि अचानक बदललेली शेड्युलिंग व्यवस्था यामुळे सुधारणा काहीशी धीमी दिसत आहे. प्रवाशी मात्र अनिश्चिततेत आहेत उड्डाण निघणार का? पुढील प्रवास मोडेल का?पुनर्बुकिंग कधी मिळेल?या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नसल्याने तणाव वाढत आहे.

संकट आणखी किती दिवस?

विमान उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पायलट शेड्युलिंगचा ताळमेळ बसण्यासाठी काही दिवस ते आठवडे लागू शकतात. त्यामुळे परिस्थिती लगेच सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. ही अडचण दूर होईपर्यंत ग्राहक आणि कर्मचारी दोघांनाही संयम ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सूदने स्पष्ट केले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News