पत्नीपेक्षा जास्त वेळ हिरोईनांसोबत घालवतात; गोविंदाची पत्नी सुनीताचा खुलासा

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलीवूडचा एव्हरग्रीन हिरो गोविंदा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत, आणि यावेळीही कारण ठरल्या आहेत त्यांच्या पत्नी सुनीता आहूजा. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच गोविंदाला त्यांच्या पत्नीच्या आग्रहाखातर स्वतःच्या पुरोहित पंडितांकडून माफी मागावी लागली होती. आता पुन्हा सुनीता आहूजा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाविषयी स्पष्टपणे आपली मते मांडली आहेत.

गोविंदाच्या चुका आणि स्वभावाबद्दल सुनीतांचे मत

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या खास मुलाखतीत सुनीता आहूजा म्हणाल्या की, प्रत्येक माणूस तरुणपणी काही ना काही चुका करतो. “मी आणि गोविंदानेही केल्या आहेत. पण जेव्हा वय वाढतं, तेव्हा काही गोष्टी शोभत नाहीत. तुमच्याकडे सुंदर पत्नी आहे, छान मूलं आहेत, मग चुका का करायच्या?” असे त्या म्हणाल्या.

पत्नीपेक्षा जास्त वेळ हिरोईनींसोबत घालवतात

या दरम्यान सुनीतांनी एक धक्कादायक विधान करत सांगितले की, “गोविंदा एक हिरो आहे, आणि ते पत्नीपेक्षा जास्त वेळ हिरोईनांसोबत घालवतात. चित्रपटसृष्टीतील स्टारची पत्नी होणं अजिबात सोपं नाही. यासाठी स्त्रीला खूप मजबूत व्हावं लागतं. अनेकदा मनाला दगड बनवावं लागतं. मला हे सगळं समजायला लग्नानंतर तब्बल 38 वर्षे लागली. तरुणपणी या गोष्टींची जाणीवच नव्हती.”

हा जन्मच पुरेसा आहे

मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, “तुम्हाला पुढच्या जन्मात पुन्हा गोविंदा पती म्हणून हवे आहेत का?”, त्यावर सुनीता म्हणाल्या, “नाही, मला नाही पाहिजे. मी आधीच सांगितलंय की गोविंदा एक उत्तम मुलगा आहे, चांगला भाऊ आहे, पण तो एक चांगला नवरा नाही. पुढच्या जन्मात तो माझा मुलगा होऊन जन्माला येऊ शकतो, पण नवरा म्हणून नाही. सात जन्म तर सोडा, हा एक जन्मच पुरेसा आहे.”

दांपत्यातील मतभेद पुन्हा चर्चेत

सुनीता आहूजांच्या या वक्तव्यामुळे गोविंदा आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. काही दिवसांपासून दोघांमधील मतभेद आणि दुराव्याच्या बातम्या अधूनमधून समोर येत आहेत. गोविंदा मात्र या सर्वांवर शांत आहेत आणि त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या सोशल मीडियावर सुनीता आहूजांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी सुनीतांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे, तर काहींनी दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या