Sunny Deol Angry On Paparazzi | बॉलिवूडचे हि – मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये मोठी चिंता होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तांनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, बुधवारी त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत. देओल कुटुंबाने निवेदन जारी करत म्हटले आहे की, धर्मेंद्र यांचा उपचार आता घरूनच सुरू राहणार आहे. तसेच माध्यमे आणि चाहत्यांनी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? Sunny Deol Angry On Paparazzi
या काळात देओल कुटुंबाने मोठा ताण सहन केला. सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी आणि ईशा देओल रुग्णालय आणि घर यामध्ये सतत धावपळ करत होते. धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा, अमीषा पटेल यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकारही हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते. परंतु या सर्वांदरम्यान काही पॅपराझींच्या वागण्याने कुटुंबाला अधिकच त्रास झाला. घराबाहेर आणि रुग्णालयाबाहेर सतत कॅमेरे झूमत होते, इतकेच नव्हे तर अन्नाचे पॅकेट्स आणणाऱ्या लोकांचेही व्हिडिओ शूट केले गेले. इतकेच नाही, तर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आल्या. या गोष्टींवर ईशा आणि हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला.

तुम्हांला लाज वाटते का
गुरुवारी सकाळी जुहूतील देओल बंगल्याबाहेर जमलेल्या पॅपराझींवर सनी देओलचा संयम सुटला. त्यांनी हात जोडत पत्रकारांना उद्देशून संतापाने म्हटले “घरी जा, तुम्हाला लाज नाही वाटत का? तुमच्या घरी आईवडील आहेत, मुले आहेत… बघा तो, च****च्या सारखा व्हिडिओ काढतोय!” असा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. सनी यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्यांचा हेतू कुटुंबाच्या प्रायव्हसीचे रक्षण करण्याचा होता. Sunny Deol Angry On Paparazzi
चाहत्यांनी सनीच्या या भूमिकेला पाठिंबा दिला असून, धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. देओल कुटुंबाने पुन्हा एकदा सर्वांना विनंती केली आहे .“कृपया अफवा पसरवू नका, आम्हाला थोडी गोपनीयता द्या. तुमच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत.”