भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत, लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने 4500 हॅप्पीसोड्स पूर्ण केले आहेत. गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने केवळ दीर्घकाळ चालणाऱ्या शो म्हणून नव्हे, तर एक सांस्कृतिक घटना म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
या विशेष क्षणाचा उत्सव साजरा करताना, निर्माते असित कुमार मोदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्या सर्व लोकांचा सन्मान केला, जे सुरुवातीपासून या प्रवासाचा भाग राहिले आहेत. लेखक, तंत्रज्ञ, सेट डिझायनर्स आणि प्रॉडक्शन टीम यांनी या दीर्घकाळातील आठवणींना उजाळा देत एकत्र येऊन आनंद साजरा केला. केक कापण्याचा सोहळा ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर ही 4500 हॅप्पीसोड्सपर्यंत पोहोचविणाऱ्या समर्पणाची आणि सहकार्याची जाणीव होती.

या यशाबद्दल बोलताना असित कुमार मोदी म्हणाले…
“4500 हॅप्पीसोड्स पूर्ण करणे हे एक आशीर्वाद आहे. हा शो आता 18 व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि आजही विविध पिढ्यांतील प्रेक्षकांसोबत एक घट्ट नातं टिकवून आहे. हे यश केवळ माझं नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीचं आहे ज्यांनी सुरुवातीपासून या प्रवासात साथ दिली आहे. कलाकार, टीम आणि प्रेक्षक सर्वांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं.”
या शोचं यश केवळ एपिसोडच्या संख्येमुळे नाही, तर त्यामागील मेहनती लोकांमुळे आहे – लेखक, कलाकार, टेक्निशियन, क्रू आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी गोकुळधाम सोसायटीला जिवंत केलं आहे. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांसाठी घरासारखी वाटते.
गेल्या काही वर्षांत TMKOC याच्या साध्या आणि मनमिळावू विनोदामुळे, ओघवत्या कथानकामुळे आणि घरगुती वाटणाऱ्या पात्रांमुळे लोकप्रिय ठरले आहे. या दीर्घ यशामागे संपूर्ण टीमचा सामूहिक प्रयत्न आणि प्रेक्षकांशी टिकून असलेलं नातं आहे.
नीला फिल्म प्रोडक्शन्स विषयी
नीला फिल्म प्रोडक्शन्सचे नेतृत्व श्री. असित कुमार मोदी करतात. त्यांनी सोनी सब, सोनी सेट, कलर्स आणि स्टार प्लससारख्या प्रमुख वाहिन्यांसाठी विविध फिक्शन व नॉन-फिक्शन शोज तयार केले आहेत. त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ – एक अशी मालिका जी 16 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजनवर अपराजित आहे.
मोदी यांनी पात्रांपासून संवादांपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपलं मन, श्रम आणि आत्मा ओतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नीला फिल्म प्रोडक्शन्सने आता डिजिटल युगाकडेही वाटचाल केली असून, त्यांच्या नीला मीडियाटेक या उपकंपनीमार्फत Web3 गेमिंग, अॅनिमेशन आणि मर्चेंडाइजिंगसारख्या क्षेत्रातही पाय रोवले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चा हा प्रवास केवळ एक मालिका नसून, भारतीय टेलिव्हिजनमधील एक प्रेरणादायी कहाणी आहे – जी आजही लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत आहे!











