विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स या चित्रपटाची सध्या संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरू आहे. १९४६ च्या कोलकाता हत्याकांड आणि नोआखाली दंगलींवर आधारित असलेला हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आज गुरुवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 7 दिवस झाले… मात्र मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पुनीत इस्सर आणि पल्लवी जोशी यांच्यासारखे कलाकार असून या चित्रपटाने अपेक्षित अशी कमाई (The Bengal Files Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर केलेली नाही. आज गुरुवारी तर द बंगाल फाईलने फक्त 8 लाखांची कमाई केली आहे.
कोणत्या दिवशी किती कमाई?? The Bengal Files Box Office Collection
मीडिया रिपोर्ट नुसार, ‘द बंगाल फाइल्स’ने पहिल्या दिवशी शुक्रवारी १.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी २.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी रविवारी २.७५ कोटी रुपये कमवले. चौथ्या दिवशी सोमवारी चित्रपटाने १.१५ कोटी रुपये कमवले. पाचव्या दिवशी मंगळवारी चित्रपटाने १.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सहाव्या दिवशी चित्रपटाने १ कोटी रुपयांची कमाई केली. तर आज सातव्या दिवशी या चित्रपटाने केवळ ८ लाख रुपये कमवले आहेत. म्हणजेच काय तर बंगाल फाईलने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण 11.05 कोटींची कमाई केली आहे.

कोलकाता येथे झालेल्या लाँच कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळामुळे चित्रपट अधिकच चर्चेत आला. परंतु, या चर्चेचा चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. उलट हा चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत फेल गेला असच म्हणावं लागेल. असे म्हटले जात आहे की द बंगाल फाइल्सचा निर्मिती खर्च ३५ कोटी रुपये आहे. …त्या तुलनेत चित्रपटाची कमाई काहीच नाही. The Bengal Files Box Office Collection
‘द बंगाल फाइल्स’ची स्टार कास्ट
‘द बेंगाल फाईल्स’मध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पुनीत इस्सार, गोविंद नामदेव, बब्बू मान, पल्लवी जोशी, पलोमी घोष, मोहन कपूर, नमाशी चक्रवर्ती, अनुमा अरोरा, सतवंत कौर, रिचर्ड कीप, शुभंकर दास, दिव्या विमा, राज पालश, राजकुमार दास आणि राजकुमार सावंत यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित झाला आहे.