बापरे! लग्नात नवरीने केली शाहरुख खानकडे वेगळीच मागणी; किंग खानचाही भन्नाट रिप्लाय

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूडचे किंग खान शाहरुख खान उच्चभ्रू आणि हाय-प्रोफाइल लग्नसमारंभांमध्ये परफॉर्म करण्यासाठी ओळखले जातात. अशाच एका भव्य वेडिंग रिसेप्शनमध्ये शाहरुखची उपस्थिती आणि त्यांचा नवरीसोबतचा मजेशीर संवाद सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दिल्लीतील या रिसेप्शनमध्ये शाहरुख खान स्टेजवर नवरीसोबत उभे होते. यावेळी नवरीने किंग खानला त्यांच्या चर्चित पान मसाला जाहिरातीतील प्रसिद्ध ओळ “जुबां केसरी” बोलण्याची मागणी केली. नवरीच्या या अनपेक्षित रिक्वेस्टवर शाहरुखने दिलेला प्रतिसाद तर आणखी धमाल ठरला.

शाहरुखचा मजेशीर अंदाज

नवरीच्या या मागणीवर शाहरुख मोठ्याने हसत म्हणाले, “अशा गोष्टी आता बॅन झाल्यात, आणि हे बोलायला मी पैसे घेतो डार्लिंग… पप्पांना सांगून ठेव.” त्यांनी पुढे खोडकर अंदाजात म्हटलं, “इथे आपण चांगल्या गोष्टी बोलतोय, काय ‘जुबां केसरी जुबां केसरी’ करायचं! हा मजेशीर प्रसंग पाहून उपस्थित लोक तर हसून लोटपोट झालेच, पण सोशल मीडियावरही हा व्हिडिओ धडाक्यात व्हायरल झाला. X (ट्विटर) वर @Incognito_qfs या अकाउंटवरून हा क्लिप पोस्ट होताच हजारो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.

मला बॅन करशील काय?”

नवरीने पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर शाहरुखने तिला खेळकरपणे विचारलं, “तू मला बॅन करवशील का? तू माझी फॅन आहेस की विमलची फॅन?” ही लाईन ऐकताच सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि मजेदार प्रतिक्रिया दोन्हींची रेलचेल पाहायला मिळत आहे. काहींनी शाहरुखच्या ह्यूमरचे कौतुक केले तर काहींनी विमल जाहिरातींची खिल्ली उडवली.

विमल जाहिरातीवरील वाद

याच वर्षी शाहरुख खानला विमल पान मसाला जाहिरातीसंबंधित तीन कायदेशीर नोटिसा आल्या होत्या. या जाहिराती लोकांना दिशाभूल करतात असा आरोप करण्यात आला होता. शाहरुखसोबत अजय देवगण आणि टायगर श्रॉफदेखील ‘जुबां केसरी’ मोहिमेमध्ये दिसतात. शाहरुख खानचा नैसर्गिक विनोदी अंदाज, त्यांची सहज शैली आणि नवरीसोबतचा हा मनमोकळा संवाद प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. वेडिंग रिसेप्शनमधील हा छोटासा क्षण आता सोशल मीडियावर मोठ्या मनोरंजनाचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या