Priya Marathe death reason Cancer : कोणत्या कर्करोगाने घेतला प्रिया मराठेचा जीव? कर्करोगाच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Priya Marathe death due to cancer : गेल्या दोन वर्षांपासून प्रिया एकटीच कॅन्सरशी लढा देत होती. या दरम्यान ती जवळच्या लोकांनाही भेटली नाही. कोणी भेटायची इच्छा व्यक्त केली तरीही ती तयार नव्हती.

Priya Marathe News : मराठीतील लोकप्रसिद्ध अभिनेत्री (Priya Marathe death) प्रिया मराठे हिचं (३१ ऑगस्ट २०२५) वयाच्या ३८ व्या वर्षी मीरा रोड येथे राहत्या घरी कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्ही मालिकांसह नाटक आणि चित्रपटातही तिने चांगल्या भूमिका बजावल्या. पवित्र रिश्ता या मालिकेतील प्रिया तर आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

प्रियाने पवित्र रिश्ता – अर्चनाच्या लहान बहिणीची भूमिका, कसम से (विद्या बाली), कॉमेडी सर्कस के सुपर स्टार, ( Contestant) यासारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये तर
तू भेटशी नव्याने (प्रोफेसर रागिणी), चार दिवस सासुचे – (सोना अशोक देशमुख), तू तिथे मी (ज्योती मोहिते), या सुखांनो या (पावनी अधिकारी), स्वराज्य रक्षक संभाजी (गोदावरी), स्वराज्य जननी जिजामाता येऊ कशी तशी मी नांदायला – (मैथिली), तुझेच मी गीत गात आहे ( मोनिका) या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

प्रियाला कर्करोगाची लागण कधी झाली? (Priya Marathe death due to cancer)

मिळालेल्या माहितीनुसार साधारण अडीच वर्षांपूर्वी तिला कर्करोगाची लागण झाली होती. तुझेच मी गीत गात आहे (tuzech me geet gaat aahe marathi serial) या मालिकेदरम्यान तिला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या होत्या. आणि यादरम्यान तिने ब्रेक घ्यायचा ठरवलं. यासंदर्भातील पोस्ट तिने सोशल मीडियावरही शेअर केली होती. त्यानंतर ती कॅन्सरमधून बरी झाली आणि पुन्हा काम सुरू केलं. मात्र पुन्हा एकदा कॅन्सरने डोकं वर काढलं. यानंतर प्रियाने काम थांबवलं. मात्र ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजता प्रियाने अखेरचा श्वास घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रिया मराठेच्या कर्करोगाबद्दल कुणालाच नव्हतं माहीत

तिच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर अनेकांचा यावर विश्वास बसत नव्हता. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी प्रिया मराठेचा पती शंतनू मोघे याला कॉल करून तिला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याने यासाठी नकार दिला होता. त्याकाळात तिची प्रकृती खूप जास्त बिघडली होती. प्रियाने कर्करोग उपचारासाठी आवश्यक शस्त्रक्रियाही केली होती. मात्र तिचे केस गेले होते, ती खूप बारीकही झाली होती. अशा अवस्थेत तिला कोणालाही भेटायची इच्छा नव्हती असं काही व्हिडिओमधून सांगितलं जात आहे.

मुलांचा विचारही पुढे ढकलला… (priya Marathe children)

प्रिया मराठे आणि शंतनू मोघे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. अत्यंत सुंदर जोडपं म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. प्रिया मराठेची इच्छाशक्ती मोठी होती. तिच्या स्वत:च्या हिमतीवर मीरा रोडमध्ये मोठं घर खरेदी केलं होतं. त्याचे हफ्ते ती स्वत: भरत होती. त्यामुळे मुलाचा विचार तिने पुढे ढकलला होता. सर्व कमाई घराच्या लोनमध्ये जात होता, त्यात करिअरकडे लक्ष द्यायचं असल्याने तिने मुलाचा विचार पुढे ढकलला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

प्रिया मराठेच्या कर्करोगाबाबत आधीही फारशी चर्चा झाली नव्हती. आताही तिच्या कुटुंबीयांकडून तिच्या कर्करोगाबाबत काहीच माहिती कळू शकलेली नाही. प्रियाच्या निधनाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

कर्करोगाच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष l cancer symptoms

धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण स्वत:कडे अपेक्षित लक्ष देत नाही. मात्र शरीर आधीच अनेक संकेत देत असतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

१ वजन झपाट्याने कमी होणं

२ शरीराच्या कोणत्याही भागात (स्तनात) गाठ येणे

३ तोडांत किंवा त्वचेवर एखादा व्रण, जो बराच काळापासून बरा होत नसेल.

४ शौच करताना किंवा लघवीदरम्यान रक्तस्त्राव

५ अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होणे

६ सतत थकवा जाणवत राहणे, फ्रेश न वाटणे

७ सततचा खोकला, औषधोपचार करूनही बरं न वाटते.

(तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दीर्घकाळ दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या)


About Author

Smita Gangurde

Other Latest News