Varun Dhawan Kanya Pujan : नवरात्रीत वरुण धवनने केले कन्यापूजन, Photo व्हायरल

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नवरात्रोत्सवात आपल्या संस्कारांची एक झलक चाहत्यांना दाखवली. दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने त्याने कन्या पूजन (Varun Dhawan Kanya Pujan) केले आणि स्वतः मुलींसोबत जमिनीवर बसून भोजनही केले. या सुंदर क्षणाचे फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते भारावून गेले आहेत.

काय आहे फोटो मध्ये ? Varun Dhawan Kanya Pujan

फोटोंमध्ये वरुण पाच मुलीं आणि एका लहान मुलासोबत जमिनीवर बसून प्रसाद घेताना दिसत आहे. या सर्व मुलांनी कागदी प्लेट्स आणि प्लास्टिकच्या ग्लासमध्ये हलवा, चणे आणि पुरीचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर वरुण स्टीलच्या थाळीत भोजन करत होता. पोस्टमध्ये त्याने लिहिले, “दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा. बेस्ट मील.”

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

वरुणचे हे संस्कारी रूप चाहत्यांना खूप भावले असले तरी काही युजर्सने त्याला ट्रोल देखील केले. काही लोकांनी प्रश्न केला की, “मुलांना स्टीलच्या प्लेट्स का नाही दिल्या?” एका युजरने लिहिले, “सर, आपण स्वतः स्टीलच्या प्लेटमध्ये खाता आणि मुलांना पेपर प्लेटमध्ये? हे योग्य नाही..

चाहत्यांकडून ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

तरीही वरुणचे चाहते त्याच्या बाजूने ठाम उभे राहिले. एका युजरने प्रत्युत्तर दिले, “सतत नकारात्मकता शोधणं बंद करा. सेलिब्रिटी असला म्हणून प्रत्येक गोष्टीत त्रुटी काढायची गरज नाही.” दुसऱ्याने लिहिले, “खूप घरांमध्ये असं होतं की मुलं जेवण पूर्ण करत नाहीत, म्हणून त्यांना पेपर प्लेट दिल्या जातात.” आणखी एकाने लिहिले, बच्च्यांसोबत जमिनीवर बसून जेवण करणं हीच त्याच्या नम्रतेची आणि चांगल्या मनाची ओळख आहे.”

नवरात्रीच्या या पवित्र सणात वरुण धवनने दाखवलेली ही साधेपणाची आणि श्रद्धेची भावना (Varun Dhawan Kanya Pujan) अनेकांना भावली. सोशल मीडियावर ट्रोलिंग झाली असली तरी अनेकांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या