Vicky Jain Hospitalized : विक्की जैन रुग्णालयात भरती, हाताला प्लास्टर ; अंकितालाही नव्हती कल्पना!

व्हायरल फोटोंमध्ये विक्की जैन हॉस्पिटलच्या बेडवर लेटेले असून, त्यांच्या हाताला प्लास्टर बांधलेले दिसत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचे पती आणि उद्योजक-व अभिनेता विक्की जैन (Vicky Jain Hospitalized) सध्या रुग्णालयात भरती असून, त्यांच्या हाताला प्लास्टर चढवण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या हॉस्पिटलमधील काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

रुग्णालयात बेडवर विश्रांती घेत असलेले फोटो व्हायरल- Vicky Jain Hospitalized

व्हायरल फोटोंमध्ये विक्की जैन हॉस्पिटलच्या बेडवर लेटेले असून, त्यांच्या हाताला प्लास्टर बांधलेले दिसत आहे. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हसरा भाव दिसून येतो, ज्यामुळे चाहत्यांनी त्याच्या सकारात्मकतेचे कौतुक केले आहे.

सेलिब्रिटी भेटीसाठी रुग्णालयात

विक्की जैनने छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे अनेक टीव्ही सेलिब्रिटी त्याची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यांच्यापैकी एक लाफ्टर शेफ्स फेम समर्थ जुरेलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो विक्कीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना दिसतो. (Vicky Jain Hospitalized)

अंकिता लोखंडेलाही नव्हती कल्पना?

त्या व्हिडीओमध्ये विक्की जैनसोबत अभिनेत्री अंकिता लोखंडेही उभी असल्याचे दिसून येते. व्हिडीओ पाहता असं वाटतंय की अंकितालाही विक्कीच्या रुग्णालयात भरती असल्याची कल्पना नव्हती, आणि ती अचानक तिथे पोहोचली आहे.

प्रकृती खालावण्यामागील कारण अजूनही अस्पष्ट

विक्की जैनच्या रुग्णालयात भरती होण्यामागील कारण अद्याप उघड झालेलं नाही. अधिकृत निवेदन अद्याप त्यांच्या कुटुंबाकडून किंवा व्यवस्थापनाकडून आलेलं नाही. मात्र, चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

लाफ्टर शेफ्स शोमधील धमाल

काही दिवसांपूर्वी विक्की आणि अंकिता एकत्र लाफ्टर शेफ्स सीझन 2 या कॉमेडी-कुकिंग शोमध्ये झळकले होते. दोघांमधील हलकीशी नोकझोंक आणि गोड प्रेम प्रेक्षकांना विशेष भावलं होतं. आता त्यांच्या चाहत्यांना या जोडीला पुन्हा एकदा सीझन 3 मध्ये पाहण्याची उत्सुकता आहे. विक्की जैनच्या तब्येतीसंदर्भातील अधिक माहिती मिळताच आम्ही तुम्हाला तत्काळ कळवू. तो लवकरच बरा होवो, हीच साऱ्यांची इच्छा आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News