Virat Anushka LoveStory : सलमानच्या एका सल्ल्यानं बदललं विरुष्काचं आयुष्य! कधीकाळी झालेलं ब्रेकअप, आज मात्र ‘परफेक्ट कपल’चं उदाहरण

विराटच्या क्रिकेटमधील दबाव, अनुष्काच्या सततच्या शूटिंगमुळे निर्माण झालेला ताण आणि बाहेरच्या अफवांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. काही काळासाठी त्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन वेगळ्या पण तेजस्वी विश्वातलं सर्वात चर्चित जोडपं म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, म्हणजेच विरुष्का (Virat Anushka LoveStory). आज त्यांचं नातं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं, पण हे नातं इतकं घट्ट आणि सुंदर होण्यापूर्वी त्यांनी एका कठीण टप्प्याला सामोरं गेलं होतं. विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगवेळी झाली. त्या वेळी दोघंही आपल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले होते. पण त्या शूटदरम्यान झालेल्या सहज गप्पांमधून दोघांमध्ये एक आपुलकी निर्माण झाली. हळूहळू ती ओळख प्रेमात बदलली आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. चाहत्यांनी त्यांना ‘विरुष्का’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली.

एकेकाळी झालं होत वीरुष्काचे ब्रेकअप – Virat Anushka LoveStory

मात्र 2016 हे वर्ष या दोघांसाठी कठीण ठरलं. विराटच्या क्रिकेटमधील दबाव, अनुष्काच्या सततच्या शूटिंगमुळे निर्माण झालेला ताण आणि बाहेरच्या अफवांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. काही काळासाठी त्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विराटच्या काही सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांना ब्रेकअपच्या चर्चा अधिकच रंगल्या.

याच काळात अनुष्का सलमान खानसोबत ‘सुलतान’ या चित्रपटाचं शूटिंग करत होती. या शूटदरम्यान सलमान आणि अनुष्कामध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. अनुष्काच्या मनात चाललेल्या भावनिक गोंधळाची जाणीव सलमानला झाली. त्याने अनुष्काला एक सल्ला दिला. “खरं प्रेम आयुष्यात एकदाच होतं. जर ते खरं असेल, तर ते नातं जपण्यासाठी प्रयत्न कर.” हा सल्ला अनुष्काच्या मनाला भिडला. काही दिवसांनी तिनं विराटशी पुन्हा संपर्क साधला आणि दोघांमधील गैरसमज दूर होऊ लागले. शेवटी त्यांनी पुन्हा एकमेकांना स्वीकारलं आणि त्यांच्या नात्याला नवी सुरुवात मिळाली. Virat Anushka LoveStory

2017 मध्ये लग्न –

2017 मध्ये या दोघांनी इटलीमध्ये एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत झालेलं हे लग्न नंतर त्यांच्या चाहत्यांसाठी एक परीकथेसारखं ठरलं. लग्नानंतर दिल्ली आणि मुंबई येथे त्यांनी रिसेप्शनचे भव्य सोहळे केले. आज त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहेत. विराट आणि अनुष्का आता दोन मुलांचे आई-वडील आहेत आणि सध्या ते आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. विराट अजूनही मैदानावर तितकाच धडाडीचा दिसतो, तर अनुष्का प्रॉडक्शन आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडते.

विरुष्काची प्रेमकथा ही फक्त दोन स्टार्सची गोष्ट नाही, तर ती एकमेकांना समजून घेण्याची, प्रयत्न करत राहण्याची आणि खरं प्रेम जपण्याची कहाणी आहे. प्रत्येक नात्यात चढउतार येतात, पण जर भावनांमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर ते नातं टिकतं…याचं जिवंत उदाहरण म्हणजे विराट आणि अनुष्का. आज ते केवळ स्टार कपल नाहीत, तर एका आदर्श जोडप्याचं प्रतीक आहेत. आणि त्यांच्या या प्रवासातला तो छोटासा पण महत्त्वाचा सल्ला सलमान खानचा आजही त्यांच्या आयुष्यातल्या ट्रनिंग पॉईंट प्रमाणे आठवला जातो.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News