MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

वॉर-२ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 4 दिवसांत कोट्यवधींचा गल्ला, प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती!

Written by:Rohit Shinde
Published:
बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘वॉर 2’  सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट देशातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 
वॉर-२ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 4 दिवसांत कोट्यवधींचा गल्ला, प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती!

वॉर-२ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाला मोठी दाद मिळत आहे. चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘वॉर 2’  सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट देशातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

वॉर-२ चित्रपटाची कोट्यवधींची कमाई

14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी भारतात मोठी कामाई केली आहे. तर दुसरीकडे जगभरात देखील या चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 4 दिवसांत 187 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात कमाई 215 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर सोबत या चित्रपटात कियारा अडवाणी, आशुतोष राणा आणि अनिल कपूर आहे. हृतिकने पुन्हा एकदा कबीरची भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्याने वॉरमध्ये साकारली होती.

तर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. दोघांची जोडी पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये येत आहेत. याशिवाय, कियाराच्या एन्ट्रीमुळे चित्रपट अधिक खास बनला आहे. अयान मुखर्जीच्या अद्भुत अ‍ॅक्शन सीन्स, भव्य सीन्स आणि स्टायलिश दिग्दर्शनामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये वर्चस्व गाजवत आहे. ‘वॉर 2’ ने भारतात 187 कोटींची कमाई केली, ज्यामध्ये हिंदीतून 130 कोटी आणि तेलुगूतून 57 कोटींची कमाई झाली. त्यामुळे 4 दिवसांनंतर भारतात एकूण 288 कोटींची कमाई झाली आहे.

वॉर २ चित्रपट का बघावा, काय विशेष?

वॉर २ हा चित्रपट पाहण्याची अनेक कारणे आहेत. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांची पहिल्यांदाच झालेली जोडी हा चित्रपटाचा मोठा आकर्षणबिंदू आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा आणखी एक दमदार अ‍ॅक्शनपट असून उच्च दर्जाची स्टंट्स, थरारक पाठलाग आणि नेत्रदीपक लोकेशन्स यात पाहायला मिळतात. कथा देशभक्ती, गुप्तहेरगिरी आणि भावनिक संघर्ष यांचा संगम आहे, जी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. उत्कृष्ट छायाचित्रण, दमदार पार्श्वसंगीत आणि भव्य स्केलमुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच अनुभवण्यासारखा आहे. अ‍ॅक्शन, थ्रिल आणि स्टार पॉवर आवडणाऱ्यांसाठी वॉर २ नक्कीच पाहण्यासारखा आहे.