Year Ender 2025 : 2025 हे वर्ष ग्लॅमर, बॉक्स ऑफिस आणि डिजिटल मनोरंजनासाठी जितकं चर्चेत राहिलं, तितकंच सेलिब्रिटी ब्रेकअप्ससाठीही लक्षात राहणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून डिसेंबरपर्यंत जवळपास प्रत्येक महिन्यात एक ना एक हाय-प्रोफाईल नातं तुटल्याची बातमी समोर आली. नात्यांवर फुलं उधळणाऱ्या इंडस्ट्रीत, अनेक जोडप्यांचा आयुष्यभराचा वादा काही तासांत, काही महिन्यांत किंवा काही वर्षांतच कोसळताना दिसला. काहींनी शांततेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तर काही ब्रेकअप्सनंतर सार्वजनिक आरोप–प्रत्यारोपांमुळे आधीच्याच नात्याचं रूपांतर कटूपणात झालं. नव्या वर्षाची चाहूल लागली असली तरी 2025 च्या या खळबळजनक वेगळ्या झालेल्या नात्यांच्या आठवणी सहज मिटण्यासारख्या नाहीत. चला, तर पाहूया या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली सेलिब्रिटी सेपरेशन आणि त्यामागची कारणं.
चहल–धनश्री घटस्फोट (Year Ender 2025)
2025 च्या सुरुवातीलाच सर्वात मोठा इंटरनेट स्टॉर्म उठवणाऱ्या जोडप्यांपैकी एक म्हणजे क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा, अफवा आणि तर्कवितर्क सुरूच होते; अखेर या जोडप्याने अधिकृतपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर धनश्रीने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून देत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

स्मृती मानधना–पलाश मुच्छल
भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या ब्रेकअपची बातमी अचानकच वाऱ्यासारखी पसरली. लग्नाचे सर्व कार्यक्रम, तयारी, पाहुणे हजेरी… आणि त्याच क्षणी दोघांचं नातं कोसळलं. स्मृती आणि पलाश यांनी काही दिवसांनी औपचारिक घोषणा करत एकमेकांना शुभेच्छा देत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. Year end 2025
तमन्ना भाटिया–विजय वर्मा
2025 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या ब्रेकअप्सपैकी एक म्हणजे तमन्ना आणि विजय वर्माचा. इंडस्ट्रीतील सर्वाधिक आकर्षक जोडप्यांमध्ये गणला जाणारा हा रिलेशनशिप अचानक संपुष्टात आला. विजयने तमन्नाला धोका दिल्याची चर्चा झाली, मात्र दोघांनीही यावर मौन बाळगणंच पसंत केलं.
सेलिना जेटली–पीटर हग
माजी अभिनेत्री सेलिना जेटलीने तिच्या विवाहजीवनावरून एक धक्कादायक खुलासा करत पती पीटर हागपासून वेगळं होण्यासाठी अर्ज दाखल केला. तिने मारहाण, मानसिक छळ आणि मालमत्तेबाबत गंभीर आरोप करत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. हा ब्रेकअप वर्षातील सर्वांत वादग्रस्त घटनांपैकी एक बनला.
मीरा वासुदेवन–विपिन पुथियाकम
दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा वासुदेवनने तिच्या तिसऱ्या लग्नाला पूर्णविराम दिला. 2025 च्या नोव्हेंबरमध्ये तिने स्वतःच हे नातं संपवल्याचे जाहीर केले. हा ब्रेकअप तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या मोठी परीक्षा असल्याचं तीने सांगितलं.
शुभांगी अत्रे–पियुष पुरी
‘भाभीजी घर पर हैं’ फेम शुभांगी अत्रेने फेब्रुवारी 2025 मध्ये पियुष पुरीपासून वेगळं होण्याची घोषणा केली. दोघांकडून समेटाचे अनेक प्रयत्न झाले, पण शेवटी न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर झाला.
संजीव सेठ–लता सभरवाल
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं संजीव सेठ आणि लता सभरवाल यांनी जून 2025 मध्ये त्यांच्या नात्याचा शेवट जाहीर केला. शांत आणि परिपक्व पद्धतीने दिलेल्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांनीही दोघांना भावनिक आधार दिला.
2025 हे वर्ष बॉलिवूड, क्रिकेट, टीव्ही आणि दक्षिण भारतीय मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रेमकथांना पूर्णविराम देणारं ठरलं. काही नाती शांततेत तुटली, काही वादळासह. पण प्रत्येक जोडप्याने स्वतःच्या जगण्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.











