Mumbai Best Bus : मुंबईतील रेल्वे लोकलनंतर बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी समजली जाते. या बेस्टमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. बेस्ट ही मुंबईकरांची दळणवळणाचे मुख्य साधन मानले जाते. मात्र ९ मे पासून बेस्ट भाडेवाडी केल्यामुळे बेस्टला फटका बसल्याचे दिसून येत आहे. कारण बेस्टचे उत्पन्न वाढले असले तरी मात्र बेस्ट प्रवाशांची संख्या मात्र घटल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे.
महसुलात वाढ मात्र प्रवासी घटले…
दरम्यान, बेस्ट डबघाईत आहे, अशी ओरड नेहमी ऐकायला मिळायची. बेस्टच्या भाडेवाढीबाबत काही दिवसांपूर्वी बेस्टचे अधिकारी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. यात बेस्टचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. दरम्यान, भाडेवाढीपूर्वी म्हणजेच 8 मे च्याआधी प्रवाशी संख्या 31 लाख होती. यातून दररोज 1 कोटी 75 लाख महसूल बेस्टच्या तिजोरीच जमा होत होता. मात्र भाडेवाढीनंतर 9 मे पासून 21 लाख 17 हजार प्रवाशांनी बेस्टमधून प्रवास केला. भाडेवाढीमुळे बेस्ट बसचे उत्पन्न वाढले असले तरी मात्र प्रवाशांची संख्या घटली आहे.

भाडेवाढीनंतर प्रवासी आणि उत्पन्न किती?
9 मे रोजी 23 लाख 17 हजार प्रवासांनी प्रवास केला. यातून 2 कोटी 93 लाख 41 हजार महसूल जमा झाला. तर 10 मे रोजी प्रवासी – 19 लाख 58 हजार आणि महसूल – 2 कोटी 56 लाख 64 हजार जमा झाला. तर 11 मे रोजी
प्रवासी – 14 लाख 81 हजार आणि महसूल – 1 कोटी 98 लाख 16 हजार जमा झाला. 12 मे प्रवासी – 19 लाख 82 हजार आणि महसूल – 2 कोटी 68 लाख 28 हजार जमा झाला 13 मे प्रवासी – 21 लाख 54 हजार आणि महसूल – 2 कोटी 83 लाख 20 हजार जमा झाला.