बीएमसी कर्मचाऱ्यांना 31,000 रूपयांचा दिवाळी बोनस; आरोग्य स्वयंसेविकांना 14,000 मिळणार!

बोनस मिळाल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसून येतो. आता बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी देखील अशीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

दिवाळी बोनस हा कामगार, कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी आनंदाचा मोठा स्रोत ठरतो. या बोनसामुळे लोकांना आर्थिक सुट मिळते आणि सणासुदीच्या खरेदीसाठी मदत होते. अनेक जण या रकमेचा उपयोग नवीन कपडे, घरगुती वस्तू, मिठाई किंवा सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी करतात. बोनस मिळाल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसून येतो. आता बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी देखील अशीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

बीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड आणि दणक्यात साजरी होणार आहे. कारण, मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भरघोस असा बोनस जाहीर केला आहे. लवकरच तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली – 2025 प्रीत्यर्थ 31 हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेने आपले अधिकारी, कर्मचारी, शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी, ध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित / विनाअनुदानित) यांच्यासाठी बोनस जाहीर केला आहे. तर सामाजिक आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका / मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, उत्साहाचे वातावरण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.दीपावली 2025 करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे.

  • महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी – 31,000 /- रुपये
  • अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी – 31,000 /- रुपये
  • महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक – 31,000 /- रुपये
  • माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित) – 31,000 /- रुपये
  • माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) – 31,000 /- रुपये
  • अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित) – 31,000 /- रुपये
  • अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) – 31,000 /- रुपये
  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट – 14,000 /- रुपये
  • बालवाडी शिक्षिका / मदतनीस – भाऊबीज भेट – 5,000 /- रुपये

About Author

Rohit Shinde

Other Latest News