Fake Paneer: पनीरच्या नावाखाली तुमच्या ताटात विष वाढलं जातंय? थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाच पत्र

Smita Gangurde

नवी दिल्ली – सध्या हॉटेलात तुमच्या ताटात वाढलेलं पनीर हे खरंच पनीर आहे की विष आहे, याची पारख करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. देशभरात सगळीकडेच बनावट पनीर (Fake Paneer) सुळसुळाट झालेला दिसतोय. वारंवार याबाबतच्या तक्रारी वाढलेल्या आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी या तक्रारींच्या वाढत्या प्रकरणात कारवाई करण्याची विनंती केली आहे. प्रल्हाद जोशी यांनी याबाबतचं एक पत्रच नड्डा यांनी लिहिलेलं आहे.

पनीरबाबत केंद्रीय मंत्र्यांचं काय पत्र?

देशभरातील फूड जाँइंट्स, रेस्टॉरन्ट्स आणि बाजारांत बनावट आणि भेसळयुक्त पनीर विकलं जात असल्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या प्रकरणांच्या तक्रारीही येतायेत. अशा प्रकरणांमुळे खाद्य पदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत नागरिकांच्या मनात चिंता वाढते आहे. याबाबत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन पोर्टलवर ग्राहकांकडून तक्रारी वाढलेल्या आहेत. या तक्रारी पाहता भेसळयुक्त पनीरची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचं दिसतंय. अशा बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळं आरोग्याचं गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी आरोग्य मंत्रालयानं ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. देशभरात खाद्यपदार्थांच्या सुरक्षा प्रमाणाचं पालन होण्याची आवश्यकता आहे.

बनावट पनीरचा आरोग्याला मोठा धोका

पनीरची गणका देशात पौष्टिक पदार्थांमध्ये करण्यात येते. उत्तर भारतात पनीर खाण्याचं प्रमाण अधिक आहे. अशात बनावट आणि भेसळयुक्त पनीरची प्रकरणे सातत्यानं समोर येत असल्यानं हा विषय चिंतेचा ठरु लागलाय. प्रल्हाद जोशींसारख्या केंद्रीय मंत्र्यांनाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे. आता आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं काय पावलं उचलण्यात येतात याकडे सगळ्याचं लक्ष असेल.

ताज्या बातम्या