Jio Bharat B2 : Jio ने फक्त 799 रुपयांत लाँच केला नवा Mobile

Asavari Khedekar Burumbadkar

देशातील आघाडीची कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने दिवाळीच्या तोंडावर आपल्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीने इंडियन मोबाईल काँग्रेस २०२५ मध्ये Jio Bharat B2 नावाचा मोबाईल लॉन्च केला आहे. अवघ्या 799 रुपयात तुम्हाला हा मोबाईल खरेदी करता येणार आहे. या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ मेसेजिंग आणि कॉलिंगसाठीच नाही तर तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन तो डिझाइन करण्यात आला आहे. आज आपण जिओच्या या नव्या मोबाईलचे खास पिक्चर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

काय आहेत फिचर्स? Jio Bharat B2 

Jio Bharat B2 हा एक कीपॅड फोन आहे. या मोबाईल मध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जिओच्या या मोबाईल मध्ये 2000mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. खास बाब म्हणजे तुम्ही या मोबाईलच्या माध्यमातून तब्बल 455 लाईव्ह चॅनल्सही पाहू शकता. जिओपेद्वारे यूपीआय पेमेंट देखील करण्याची संधी या मोबाईल मधून मिळते. आजकाल एकीकडे मोबाईल रिचार्ज किमती महागलेल्या असताना हा स्मार्टफोन मात्र रिचार्जच्या दृष्टीने सुद्धा ग्राहकांना परवडणार आहे. कारण ग्राहक अवघ्या १२३ रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल
आणि 14 जीबी इंटरनेट डेटा वाला रिचार्ज करू शकतात

यामध्ये लोकेशन मॉनिटरिंग, उजेस मॅनेजर आणि ७ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप सारखी वैशिष्ट्ये मिळतात. यूजेस मॅनेजर फीचर वापरकर्त्यांना किंवा पालकांना कोण त्यांना कॉल किंवा मेसेज करू शकते हे नियंत्रित करण्याची परवानगी देते, तसेच अनोळखी नंबर ब्लॉक किंवा मर्यादित करते. याव्यतिरिक्त, जिओने जिओ AI क्लासरूम सुरू केला आहे, जो जिओपीसीद्वारे समर्थित एक मूलभूत अभ्यासक्रम असून तो विद्यार्थ्यांना नवीन एआय तंत्रज्ञानाबद्दल शिकवेल.

शेफ्टी शिल्ड फीचर

Jio Bharat B2 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सेफ्टी शील्ड फीचर. समजा तुम्ही हा फोन तुमच्या मुलीसाठी किंवा पालकांसाठी खरेदी केला आहे आणि तो त्यांना दिल्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला जिओ भारत बी२ कनेक्ट करू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर जिओचे कंपेनियन अॅप इन्स्टॉल करावे लागेल. अॅप वापरून, तुम्ही जिओ भारत बी२ तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करू शकाल.

किंमत किती

जिओ भारत बी२ हा मोबाईल ७९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. ग्राहक अवघ्या १०० रुपयांना या मोबाईल चे बुकिंग करू शकतात. जिओ चा हा मोबाईल हा जिओ स्टोअर्स, प्रमुख मोबाईल आउटलेट्स, जिओमार्ट, अमेझॉन आणि स्विगी इन्स्टामार्ट येथे विक्रीसाठी उपलब्ध असेल.

ताज्या बातम्या